Ne Zha 2 Box Office Collection : भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम आमिर खानच्या दंगल चित्रपटाकडे आहे. दंगल चित्रपटाने भारतात 2000 कोटींचा गल्ला जमवला होता. पुष्पा 2 चित्रपटाकडून दंगलचा विक्रम मोडण्याची अपेक्षा केली जात होती, पण अल्लू अर्जूनच्या चित्रपटाला या विक्रमाच्या जवळ पोहोचणं शक्य झालं नाही. पण, आता आम्ही तुम्हाला असा एक चित्रपट सांगणार आहोत. या चित्रपटाने 2000 कोटी नाही, तर 7000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सध्या एका ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 700 कोटीची कमाई केली आहे.
9 दिवसांत 7000 कोटी कमाई करणारा चित्रपट
Ne Zha 2 या चायनीज ॲनिमेटेड चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. Ne Zha 2 ॲनिमेटेड चित्रपटाने चिनी बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. Ne Zha 2 हा चित्रपट 29 जानेवारी रोजी रिलीज झाला. मोठं-मोठे विक्रम रचत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरुच आहे. या चित्रपटाने पाहता-पाहता कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजनंतर अवघ्या 9 दिवसांत 580 कोटी चायनीज युआन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 7000 कोटी रुपये कमाई केली आहे.
'या' चिनी चित्रपटाची सर्वत्र चर्चा
लुनार न्यू इयर म्हणजे चायनीज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'ने झा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवे विक्रम रचत आहे. चीनमधील देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. 29 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 68 दशलक्ष डॉलर्सची ब्लॉकबस्टर ओपनिंग केली. या चित्रपटाने पहिल्या 7 दिवसांत अंदाजे 666 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत.
12,000 कोटींच्या कमाईचा विक्रम रचणार?
ने झा 2 चित्रपटाने 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द बॅटल अॅट लेक चांगजिन' या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. त्याच वेळी, या अॅनिमेटेड फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. ने झा 1 चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता, याने 722.5 दशलक्ष डॉलर्स कमावले होते. या चित्रपटाने 'स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स' लाही मागे टाकलं. 'स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स' चित्रपटाला अमेरिकेत एवढी कमाई करण्यासाठी 18 दिवस लागले. आता ने झा 2 प्रदर्शित होऊन फक्त 9 दिवस झाले आहेत आणि याचा आकडा 7000 कोटींच्या पुढे गेला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा 12,000 कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :