NCB Drug Case Investigation : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर चव्हाट्यावर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचीही चौकशी करण्यात आली होती. पुन्हा एकदा अर्जुन रामपालला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आलं असून 16 डिसेंबर म्हणजेच, आज अर्जुन रामपालला चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये हजर राहावं लागणार आहे.
अर्जुन रामपालला पुन्हा एकदा एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी 13 नोव्हेंबर रोजी अर्जुनची एनसीबीकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती. बॉलिवूड ड्रग्ज केस प्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीने अर्जुन रामपालच्या घराची झडती घेतली होती. अर्जुनच्या घरातून काही इलेक्ट्रिक उपकरण आणि औषधं ताब्यात घेतली होती.
अर्जुन रामपाल व्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाची देखील एनसीबीने सलग दोन दिवस 6-6 तासांसाठी चौकशी केली होती. त्यानंतर अर्जुनला एनसीबीच्या ऑफिसमध्ये बोलावलं होते. झडती दरम्यान एनसीबीला अर्जुनच्या घरी ड्रग्ज सापडल्या नव्हत्या.
दरम्यान, एनसीबीने काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील घराची झडती घेतली होती. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रायडिसला चौकशीची नोटीस देण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलवूडचे ड्रग्ज संबंध चव्हाट्यावर आले होते. त्यासंबंधी एनसीबी सध्या कसून तपास करत आहे.
अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भावाला अटक
एनसीबीने अर्जुम रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसिलाओस डेमेट्रिएड्सला ऑक्टोबरमध्ये लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ड्रग्स तस्करांच्या संपर्कात असल्याचा आरोप लावण्यात आला होता. अर्जुन रामपालचे मित्र पॉल बार्टललाही एनसीबीने ड्रग्ज केसमध्ये अटक केली आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज केस चव्हाट्यावर
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज केस चव्हाट्यावर आलं आहे. त्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वात आधी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीनं धाड टाकली होती. त्यानंततर रिया, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतच्या घरात काम करणाऱ्या काही कामगारांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रिया चक्रवर्ती आणि इतर काही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. एनसीबीकडून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांसारख्या बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :