मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा टाकला. एनसीबीच्या एका पथकाने अर्जुन रामपालच्या घर आणि कार्यालयात छापे टाकले. एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन रामपालच्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान अर्जुन रामपाल याच्या घरातून एनसीबीच्या हाती काही लागलं की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज अँगल समोर आला त्यानंतर एनसीपी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाली. तर आतापर्यंत दीपिका पदूकोण, सारा अली खान यांच्यासह अनेकांची चौकशी झाली. शिवाय या प्रकरणात अर्जुन रामपालचं नावही समोर आलं आहे.


ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला अटक, NCB ची कारवाई


बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला NCB ची अटक


याआधी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आणि खरेदी-विक्री प्रकरणी अर्जुन रामपालची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डिमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोसला पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आहे. अगिसियालोसला या प्रकरणात जामीन मिळाला होता, परंतु त्यानंतर एनसीबीने तातडीने त्याला पुन्हा ताब्यात घेतलं. याशिवाय एनसीबीने धर्मा प्रॉडक्शन्सचा माजी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर क्षीतिज प्रसादलाही आणखी एका प्रकरणात अटक केली आहे.


चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालांची पत्नी अटकेत
एनसीबीने कालच (8 नोव्हेंबर) बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक केली होती. सोबत फिरोज नाडियाडवाला यांनाही एनसीबीने समन पाठवलं होतं. त्यानुसार ते आज एनसीबी कार्यालयात हजर राहिले आहेत. माहितीनुसार, फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून एनसीबीने 10 ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत.


एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत पाच ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. हा छापा ड्रग्ज पेडलर्स आणि सप्लायरची धरपकड करण्यासाठी टाकला होता. चार ते पाच ड्रग्स पेडलर्स आणि सप्लायर्सना ताब्यात घेण्यात आलं आहे. यादरम्यान गांजा, चरस, आणि आणखी एक ड्रग सापडलं. यासोबतच रोख रक्कम आणि गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.