Nayanthara : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतचं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. 'जवान' स्टार नयनताराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नयनताराच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नयनताराचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  


नयनताराचा बोल्ड अंदाज (Nayanthara Bold Look)


'जवान' स्टार नयनतारा नुकतीच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या फॅशन इव्हेंटमधील अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नयनताराने कॅमेऱ्यासमोर किलर पोझ दिल्या आहेत. 


नयनताराच्या रिवीलिंग गाऊनने वेधलं लक्ष


नयनताराने काळ्या रंगाचा रिवीलिंग गाऊन परिधान केला आहे. अभिनेत्रीचा रिवीलिंग गाऊन खूपच लक्षवेधी आहे. यात अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. नयनताराने सिझलिंग लूकमधील आपले फोटो बाथरुममध्ये काढलेले आहेत. अभिनेत्रीचा यात बोल्ड अंदाजात दिसत आहे. नयनताराने आपली ग्लोइंग स्किन फ्लॉन्ट केली आहे. यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. 






नयनताराने हाय थाय स्लिट गाऊन परिधान केला आहे. यात अभिनेत्री आपले टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज काही चाहत्यांच्या मात्र पसंतीस उतरलेला नाही. 'जवान'च्या नयनताराला बॉलिवूडचा नाद लागला, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. काहींनी मात्र अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. नयनताराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. अभिनेत्री पहिल्यांदा एवढ्या बोल्ड अंदाजात दिसून आली आहे. 


नयनतारा वयाच्या 49 व्या वर्षी आपल्या सौंदर्याने आणि व्यक्तीमत्त्वाने चाहत्यांची मने जिंकून घेत असते. नयनताराने शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. नयनतारा या चित्रपटात शाहरुख खानसोबत रोमान्स करताना दिसली होती. नयनतारा आणि शाहरुख खानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या जोडीवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. आता नयनताराने आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे.


संबंधित बातम्या


आलिया, दीपिकालाही सारलं मागे, फक्त 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी घेतले कोट्यावधी रुपये, कोण आहे 'ती' सर्वात महागडी अभिनेत्री?