Nawazuddin Siddiqui wife Aaliya : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) पत्नी आलिया सिद्दीकीच्या (Aaliya Siddiqui) अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. कारण तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट अंधेरी कोर्टाने 29 फेब्रुवारी रोजी जारी केले होते. आलियाच्या मित्राने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 29 ब्रुवारीला तिच्याविरुद्ध 138 निगोशिएबल ॲक्ट अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2022 या वर्षात प्रदर्शित करण्यात आलेल्या होली काऊ या चित्रपटाशी संबंधित हे प्रकरण आहे. या चित्रपटाची निर्मिती नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हीने केली होती.
आलिया सिद्दीकी 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये पाहायला मिळाली होती. आलियाने तिची मैत्रीण मंजू एम गढवालसह होली काऊ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात आलियासोबत तिने 31 लाख 68 रुपये गुंतवले होते. पण पण आलियाने त्याचे पैसे परत केले नसल्याचा दावा तिच्या मैत्रीणीकडून करण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वीचे पैसे परत न केल्याने आलिया सिद्दीकीवर तिच्या मित्राने गुन्हा दाखल केला.
आलियाच्या मैत्रणीने काय म्हटलं?
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आलियाची मैत्रीण मंजू एम गढवाल हीने भाष्य केलं आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंजूने म्हटलं की, मी याआधी आलियासोबत चित्रपटाची निर्मिती करत होते. त्यानंतर आलियाने माझ्या कुटुंबाकडून काही पैसे उधार घेतले होते. हे प्रकरण मागील पाच वर्षांपासून सुरु आहे. पण अद्याप आलियाने हे पैसे परत केले नाहीत.
नवाजुद्दीन सिद्दीकीवरही केलेत गंभीर आरोप
या प्रकरणाची दोनदा सुनावणी झाली. पण दोन्ही वेळी आलिया हजर राहिली नाही. पहिल्यांदा तिचे वकिल सुनावणीकरिता आले होते आणि त्यावेळी ते मंजूसोबत सामंजस्य करण्याविषयी चर्चा करत होते. पण त्यानंतर आलिया गायब झाली. दरम्यान ती दुसऱ्या सुनावणीला देखील उपस्थित राहिली नसल्याची माहिती मंजूने दिली आहे. त्याचप्रमाणे तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 2 मे रोजी होणार आहे. आलियासोबकच मंजूने तिचा पती नवाजुद्दीन सिद्दीकीवरही आरोप केले आहेत. या सगळ्यात तो देखील तिला सामील असल्याचं तिचं म्हणणं आहे.