Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddhin Siddhiqui) हा मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. दर्जेदार अभिनय आणि अभ्यासू अभिनेता ही नवाजुद्दीनची ओळख आहे. नवाज आज लोकप्रिय अभिनेता असला तरी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. अनेकवर्ष अभिनेत्याला वाटायचं की तो चांगला दिसत नाही. अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. गोरा होण्यासाठी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो, असं तो म्हणाला आहे. 


गोरा होण्यासाठी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो : नवाजुद्दीन सिद्दीकी


बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या लूकबद्दल भाष्य केलं आहे. नवाजुद्दीन म्हणाला की फेअरनेस क्रीम लावायचं मला वेड लागलं होतं. पण या प्रोडक्टने मला काहीही फायदा झालेला नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला,"करिअरच्या सुरुवातीला माझा सावळा रंग असल्याने मला खूप न्यूनगंड वाटायचा. त्यामुळे गोरा होण्यासाठी मी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो. पण या क्रीमचा मला काहीही फायदा झाला नाही". 






नवाजुद्दीन म्हणाला,"आसपास असणारी मंडळी माझ्या रंगावर भाष्य करत असे. त्यांच्यासाठी मी गुड लुकिंग व्यक्ती नव्हतो. त्यांच्यामुळे मलादेखील मी चांगला दिसत नाही असं वाटू लागलं. पण नंतर मी विचार करण्याची पद्धत बदलली. या गोष्टीचा मला वैयक्तिकरित्या खूप फायदा झाला. 


नवाजुद्दीन पुढे म्हणाला,"अनेक वर्षे मी चांगला दिसणारा व्यक्ती नाही, असं मला वाटत होतं. पण नंतर मी स्वत:वर प्रेम करायला लागलो. आसपासची लोक आणि त्यांची विचारसरणी या गोष्टीमुळे न्यूनगंड येत असतो. तुम्ही कसे दिसता यावर तुमचा स्वत:चा आत्मविश्वास असायला हवा. कारण न्यूनगंड हा नेहमी इतर व्यक्तींमुळे येत असतो".


नवाजुद्दीनचा मोठा संघर्ष... 


नवाजुद्दीनने आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सिनेक्षेत्रात अनेक वर्ष काम करत असूनही त्यांना मुख्य भूमिकेसाठी कोणी विचारणा केली नव्हती. याबद्दल बोलताना नवाजुद्दीन म्हणाले,"मी एक गुणी अभिनेता आहे हे सिद्ध करण्यासाठी 10-12 वर्ष लागली आहेत. पण हा संघर्ष कायम राहणार आहे. आता कुठे लोक माझं काम आणि मला स्वीकारायला लागले आहेत". नवाजुद्दीनच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Haddi Movie Review : नवाजुद्दीनच्या अभिनयाने नटलेला, परंतु सादरीकरणात फसलेला 'हड्डी'