Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दीकी (Mehroonisa Siddiqui) यांच्या तक्रारीवरून नवाजुद्दीनची दुसरी पत्नी जैनब उर्फ आलियाविरोधात (Aaliya Siddiqui) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी (Versova Police) जैनबला चौकशीसाठी बोलावले आहे.
मेहरुनिसा सिद्दीकी यांच्या तक्रारीची दखल वर्सोवा पोलिसांनी घेतली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जैनबविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 452, 323, 504, 506 या कलमाअंतर्गत जैनबवर गुन्हा दाखल (Nawazuddin Siddiqui Mother Files Police Complaint) करण्यात आला आहे. नवाजुद्दीनची आई आणि जैनब उर्फ आलिया यांच्यात मालमत्तेवरुन वाद आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया 2010 साली लग्नबंधनात अडकले होते. पण 2020 साली त्यांच्यात वाद झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलांसाठी ते पुन्हा एकत्र आले. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला होता,"मला सकारात्मक राहण्याची गरज आहे. जैनब माझ्या मुलांची आई आहे त्यामुळे मी कायमच तिच्या सोबत आहे".
आलिया ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी नवाजने नैनीताल जवळील हल्दवानी येथे राहणाऱ्या शीबा नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. नवाजने शीबाशी त्याच्या आईच्या निवडीनुसार लग्न केले होते. मात्र, हे लग्न सहा महिनेही टिकलं नाही. लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नवाज अलियासोबत लग्नबंधनात अडकला.
नवाजुद्दीन आणि आलियाचे अफेअर 2004 मध्ये सुरू झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये वारंवार झालेल्या वादामुळे लग्नाआधीच अनेकदा त्यांचा ब्रेक-अप झाला होता. याचा उल्लेख नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आत्मचरित्र 'अॅन ऑडिनेरी लाइफ - ए मेमॉर' मध्ये सविस्तर करण्यात आला आहे. नवाज आणि आलियाला शौरा आणि यानी ही दोन मुलं आहेत.
एका मुलाखतीत नवाज म्हणाला होता,"मला माझ्या आईनेच लग्न टिकवण्याचा सल्ला दिला होता. आई म्हणाली होती,लग्न टिकवण्याची संधी आली तर सोडू नकोस. त्यामुळे मी आणि आलियाने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता".
संबंधित बातम्या