Allu Arjun Won Best Actor National Award:   69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards 2023) घोषणा काल (24 ऑगस्ट) करण्यात आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' ( Pushpa: The Rise)  या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा होताच अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर जल्लोष केला. पुष्पा: द राइज हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता? या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कोणकोणत्या गोष्टी घडल्या? याबाबात जाणून घेऊयात...


अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांनी केला जल्लोष


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर जल्लोष केला. अनेकांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर फटाकले फोडले. तसेच अल्लू अर्जुननं त्याच्या घराबाहेर येऊन फोटोग्राफर्ससमोर फोटोसाठी पोज दिली.  


कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट?


अल्लू अर्जुनला  'पुष्पा: द राइज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनेकांनी पुष्पा द राइज हा चित्रपट पाहिला असेल, पण ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही, ते हा चित्रपट घरबसल्या पाहू शकतात. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)  तुम्ही 'पुष्पा: द राइज'  हा चित्रपट पाहू शकता.  


पुष्पा चित्रपटाचे 'बिहाईंड द सिन्स' 


पुष्पा चित्रपटाचे शूटिंग आंध्र प्रदेशमधील मारेदुमिली या जंगलामध्ये झाले. पुष्पा द राइज हा चित्रपट चंदनावर आधारित आहे. त्यामुळे चंदनाच्या तस्करीचा सिन शूट करण्यासाठी जंगलामध्ये काही गाड्या आणाव्या लागत होत्या. या गाड्या जंगलामध्ये आणण्यासाठी जंगलामध्ये रस्ता तयार करावा लागला होता. शूटिंग दरम्यान चित्रपटाची संपूर्ण टीम जंगलामध्ये जात होती. टीमला जंगलामध्ये  जाण्यासाठी जवळपास 300 गाड्या लागत होत्या.


पुष्पा चित्रपटाची स्टार कास्ट


'पुष्पा: द राइज' या चित्रपटामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. तसेच अभिनेत्री समंथानं या चित्रपटामधील ऊ अंटवा या गाण्यामध्ये डान्स केला.  पुष्पा द राइज  या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


पुष्पा-2 येणार प्रेक्षकांच्या भेटीस


 पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा एक खास व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन एका जंगलामध्ये जातो. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन हा  'अब रुल पुष्पा का' हा डायलॉग म्हणताना दिसला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pushpa 2:  तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? उत्तर मिळालं, पाहा पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ