Happy Birthday Rashmika Mandanna : साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आज तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. रश्मिका लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) आगामी सिनेमात दिसणार आहे. रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. 


रश्मिका मंदाना लवकरच विजय थलापतीसोबत आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन वामशी पेडिपल्ली करणार आहेत. या सिनेमात रश्मिका विजय थलापतीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सिनेमाची घोषणा करत निर्मात्यांनी रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. या सिनेमात रश्मिका आफ्रीन नामक काश्मिरी मुस्लीम तरुणीची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा तेलुगू, तामिळ आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 





रश्मिकाचा 'अॅनिमल' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करत आहेत. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच लवकरच ती 'मिशन मजनू' या सिनेमातदेखील दिसणार आहे.


संबंधित बातम्या


Mere Desh Ki Dharti : देश बदल रहा है! 'मेरे देश की धरती' सिनेमाचे पोस्टर आऊट


Divya Bharti : 18 व्या वर्षी दिव्या भारतीनं साजिद नाडियाडवालासोबत बांधली लग्नगाठ; लग्नाच्या 11 महिन्यांनी झालं होत्याचं नव्हतं


Ranbir-Alia Wedding : मुहूर्त ठरला! आलिया-रणबीर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha