National Cinema Day 2023 : मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAIE) देशभरात 13 ऑक्टोबर 2023 रोजी 'राष्ट्रीय चित्रपट दिन' (National Cinema Day 2023) साजरा करणार आहे. सिनेप्रेक्षकांना फक्त 99 रुपयांत सिनेमा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता 13 ऑक्टोबरला सर्व थिएटर हाऊसफुल्ल होणार आहेत.
99 रुपयांच्या तिकीटांची ऑफर रिक्लाइनर आणि IMAX, 4DX सारख्या प्रीमियम फॉर्मेटसाठी लागू राहणार नाही. तुम्हाला जर स्वस्तात सिनेमा पाहायचा असेल तर तुमच्यासाठी ही ऑफर परफेक्ट आहे. 4000 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर प्रेक्षकांना सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलीस, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मूवी टाइम, वेव, एम2के आणि डिलाइट यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त गेल्या वर्षीदेखील अशी ऑफर ठेवण्यात आली होती. त्यावेळी 6.5 मिलियन मंडळींनी एका दिवसात सिनेमा पाहिला. एका दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 75 कोटींची कमाई केली. यंदादेखील संपूर्ण भारतात 99 रुपयांत प्रेक्षकांना सिनेमा पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट दिनी 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनं तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करु शकता :
स्टेप 1: सर्वप्रथम पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या वेबसाइट्स ऑपन करा.
स्टेप 2: त्या साइट्सवर लॉग-इन करा.
स्टेप 3: त्यानंतर सिटी आणि एरिरा सिलेक्ट करुन थिएटर निवडा.
स्टेप 4: जो चित्रपट बघायचा आहे, तो सिलेक्ट करा.
स्टेप 5 : त्यानंतर सर्वात शेवटी वेळ सिलेक्ट करा. वेळ सिलेक्ट केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करुन प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.
राष्ट्रीय चित्रपट दिवस' साजरा केला जात नव्हता आता यावर्षापासून 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे बंद पडलेले थिएटर्स आता दोन वर्षानंतर पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जात आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात न गेलेल्या प्रेक्षकांना परत आणण्यासाठी 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' साजरा करण्याचा निर्णय मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं घेतला आहे. 23 सप्टेंबर रोजी आता 75 रुपयांना प्रेक्षक चित्रपट पाहू शकणार आहेत.
संबंधित बातम्या