National Cinema Day : मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं (MAI) मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं ट्विटरवर एक ट्वीट करुन माहिती दिली आहे की, 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' (National Cinema Day) हा 16 सप्टेंबरला नाही तर  23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. आधी मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं 16 सप्टेंबर रोजी  'राष्ट्रीय चित्रपट दिवस'  साजरा केला जाणार आहे, अशी माहिती दिली होती पण हा निर्णय आता त्यांनी बदलला आहे. पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटी प्राइड, एशियन, मुक्ता ए 2, मूवीटाइम, वेव, एम 2 के आणि डिलाइट या देशभरातील  मल्टीप्लेक्समध्ये  'राष्ट्रीय चित्रपट दिनी' प्रेक्षक 75 रुपयांत चित्रपट पाहू शकणार आहेत. 


यावर्षापासून साजरा करण्यात येणार 'राष्ट्रीय चित्रपट दिवस'
याआधी 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' साजरा केला जात नव्हता आता यावर्षापासून 'राष्ट्रीय चित्रपट दिवस'  साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे बंद पडलेले थिएटर्स आता दोन वर्षानंतर पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जात आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात न गेलेल्या प्रेक्षकांना परत आणण्यासाठी 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' साजरा करण्याचा निर्णय मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं घेतला आहे.  23 सप्टेंबर रोजी आता 75 रुपयांना प्रेक्षक चित्रपट पाहू शकणार आहेत. 






75 रुपयांमध्ये पाहा हे चित्रपट 


सिनेप्रेमींना 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' खास 75 रुपयांत सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात 'केजीएफ चॅप्टर 2', 'आरआरआर', 'विक्रम' या दाक्षिणात्य सिनेमांचा, 'भूल भुलैया 2' या बॉलिवूड सिनेमाचा आणि डॉक्टर स्ट्रेंज आणि टॉप गन : मेवरिक' या हॉलिवूड सिनेमांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत या सिनेमांनी सिनेमागृहात धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. 

 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :