नवी दिल्ली : देशभरातील चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य आहे. चित्रपट सुरु होण्यासाठी थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाचा देशभरातील चित्रपटगृहांना दिला आहे.
याआधी केवळ महाराष्ट्रातच चित्रपटाआधी राष्ट्रगीत अनिवार्य होतं. मात्र आता देशभरातील सर्वच थिएटरमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक असेल.
इतकंच नाही तर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहणंही गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तसंच कोणत्याही परिस्थिती अपूर्ण राष्ट्रगीत लावण्यास परवानगी नसेल, असंही न्यायालयाने नमूद केलं.
केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्देश सर्व राज्यांना द्यावेत, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. शिवाय व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच वापर करु नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातूनही याबाबत जागरुकता केली जाईल.