मुंबई : 'नकाब'फेम बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने 26 तारखेला एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचं 'शिवांश' असं नामकरण करण्यात आलं.


उर्वशी अभिनेता सचिन जोशीसोबत 2012 मध्ये विवाहबंधनात अडकली होती. त्यांना समायरा ही तीन वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी उर्वशीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून पती सचिन आणि मुलगी समायरा हे बाळ आणि आईला घरी नेण्यासाठी आले होते.

2007 मध्ये उर्वशीने नकाब चित्रपटातून डेब्यू केला. त्यानंतर बाबर, खट्टा मिठा, चक्रधर यासह काही तेलुगू सिनेमांमध्ये तिने काम केलं. 2008 मध्ये फिअर फॅक्टर - खतरों के खिलाडीच्या पहिल्या पर्वातही उर्वशी सहभागी झाली होती.

2011 मध्ये अझान चित्रपटातून उर्वशीचा पती- अभिनेता सचिन जोशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 2013 सनी लिओनसोबत त्याचा 'जॅकपॉट' सिनेमाही गाजला होता.

लग्नानंतर उर्वशीने स्वतःचं नाव बदलून रैना जोशी ठेवलं आहे. सचिन-उर्वशी यांना समायरा ही तीन वर्षांची मुलगी आहे. जोशी कुटुंब सध्या पुण्यात राहतं.

ऑक्टोबर महिन्यात उर्वशीचं बेबी शॉवर करण्यात आलं होतं. त्यावेळी उर्वशी आणि समायराचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते.