Nana Patekar Tweet : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की,"मुनगंटीवार महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन..  जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर बघा". त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं. आरोप-प्रत्यारोप झाले. आता यावर नानांनी त्यांची भूमिका एबीपी माझाकडे व्यक्त केली आहे.


'त्या' ट्वीटमागची (Nana Patekar Tweet) भूमिका काय याबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले,"सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे. व्यस्थेतील राजकीय मंडळी हा भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. राजकारण्यांना चिमटे काढणं गरजेचं आहे. भ्रष्टाचारामध्ये आपलं नाव येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. सगळेच वाईट आहेत अशातला भाग नाही. फक्त काही मंडळीच वाईट आहेत".


नाना पाटेकर पुढे म्हणाले,"आपण कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही हे दुर्दैव आहे. पण न पटणाऱ्या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे. फक्त मेणबत्त्या पेटवून काही होत नाही. आपण शांत राहिलो तर अनेक गोष्टी गृहित धरल्या जातात. त्यामुळे मी शांत बसू शकत नाही. जरी मला उद्या कोणी गोळी घातली तरी मला त्याचं काही वाटणार नाही. पण मला 'मी' म्हणून इतकी वर्ष जगता आलं याचा मला आनंद आहे. समाज काय बोलेल यात मला आयुष्य घालवायचं नाही". 


नेमकं प्रकरण काय? 


अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा बाहेर काढणारी शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार (Sudhir Mungantiwar) इंग्लंडला जाणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवारांना डिवलचं. त्यांनी लिहिलं,""मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत..त्याबद्दल अभिनंदन...जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा".






नानांच्या या टीकेवर स्पष्टीकरण देत सुधीर मुनगंटीवार म्हणाले,"नाना पाटेकरांनी ट्वीट करण्याआधी मला फोन केला होता. अभिनंदन केलं. तसेच ते पुढे म्हणाले, सुधीर मला मनापासून खूप आनंद होत आहे. तुझं खूप कौतुक. त्यामुळे नाना पाटेकरांनी टीका केलेली नाही. त्यांची एक भाषाशैली आहे. त्यांच्या त्या शैलीत ते म्हणाले,"वाघनखे तर येत आहेत...पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतला जो देश आहे त्यासाठी सरकारने काम करावं". त्यावर मी त्यांना म्हणालो,"मोदी ED च्या चौकश्या करत आहेत..त्या भ्रष्टाचाराचा कोथळा काढण्याचाच भाग आहे".   



संबंधित बातम्या


Nana Patekar : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं; म्हणाले, "भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा"