Naga Chaitanya Deletes Samantha's Post From Instagram : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य लवकरच आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. अभिनेत्रआ समंथा रुत प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर आता नागा चैतन्य दुसरं लग्न करणार आहे. समंथा रुत प्रभू आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या चार वर्षानंत घटस्फोट घेतला. यानंतर दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. समंथा तिच्या करियरवर लक्ष केंद्रित करत आहे, तर नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. नागा चैतन्य गर्लफ्रेंड अभिनेत्री शोभिता धुलीपालासोबत लग्न करणार आहे. शोभितासोबत लग्नाआधी नागाचैतन्यने समंथाच्या आठवणी पुसल्या आहेत.


शोभितासोबत लग्नाआधी नागा चैतन्यने पुसल्या समंथाच्या आठवणी


शोभिता आणि नागा चैतन्य लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्याआधी नागा चैतन्यने सोशल मीडियावरुन समंथाच्या आठवणी पुसल्याचं दिसत आहे. नागा चैतन्यने सोशल मीडियावरील समंथासोबतचा जुना फोटो डिलीट केला आहे. समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर, शोभिता धुलिपालाने नागा चैतन्यच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. दोघांचा साखरपुडा पार पडलाअसून सध्या लगीनघाई सुरु आहे. त्याआधी नागा चैतन्यने सोशल मीडियावरून एक्स वाईफचा शेवटचा फोटोही डिलीट केला आहे.


डिलीट केला समंथासोबतचा शेवटचा फोटो 


मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्यने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समंथा रुत प्रभूसोबतला इंस्टाग्रामवर फोटो हटवला आहे. नागा चैतन्यने शोभितासोबत आयुष्याची नवी सुरुवात करण्याआधी एक्स वाईफ समंथासोबतचा त्याचा शेवटचा फोटो हटवला आहे. 27 ऑक्टोबरला नागा चैतन्यने समंथासोबता रेस ट्रॅकवरील फोटो डिलीट केला आहे. हा फोटो 2018 मध्ये फॉर्मूला 1 रेस ट्रॅकवर काढण्यात आला होता. तो आता नागा चैतन्यने डिलीट केला आहे.


नागा चैतन्यने समंथासोबतचा हा फोटो केला डिलीट


एक फोटो अजूनही नाही केला डिलीट


नागा चेतन्य याने समंथासोबतचा एक फोटो मात्र डिलीट केलेला नाही. समंथा सोबतचा माजिली चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो मात्र नागा चैतन्यने हटवलेला नाही. काही नेटकऱ्यांनी फोटो हटवण्याची मागणी केली आहे, तर नागा चैतन्य पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवत असल्याने त्याने चित्रपटाचं पोस्टर हटवलं नसल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 


'हा' फोटो हटवण्याची नेटकऱ्यांची मागणी






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Shanaya Kapoor Debut : आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कपूर कुटुंबाची लाडकी परी करणार विक्रांत मेस्सीसोबत पदार्पण