Naal 2 Review:   नाळ-2 (Naal 2) हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक खास स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. नाळ-2 या चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडल्यानंतर अनेक कलाकारांनी या चित्रपटाच भरभरुन कौतुक केलं आहे. हा चित्रपट दिवाळीत आपल्या भावा-बहिणीसोबत नक्की बघा, असं अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना सांगितलं आहे.

  


प्रियदर्शन जाधवनं केलं कौतुक


अभिनेता प्रियदर्शन जाधवनं नाळ-2 या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, "चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, इतका गोड, निरागस सिनेमा खूप वर्षानंतर पाहिला. दिवाळी, भाऊबिजेला तुमच्या कुटुंबासोबत हा चित्रपट नक्की बघा!"


प्रथमेश परब म्हणला,  "दिवाळीची सुट्टी आहे. दिवाळीच्या सुट्टीत घरी फराळ असतो. त्यामध्ये गोड पदार्थ असतात. पण जर तुम्हाला गोड चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही नाळ-2 हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. मला वाटतं की तुम्ही जर हा चित्रपट बहिणीसोबत पाहिला तर तुम्हाला हा नक्की रिलेट करेल."






स्मिता तांबे म्हणते, "भाऊ आणि बहिणीनं एकत्र जाऊन हा चित्रपट बघा"


स्मिता तांबेनं नाळ-2 चित्रपटाबद्दल सांगितलं, "हा एक अप्रतिम अनुभव आहे. हा चित्रपट भाऊबिजेची खरी ट्रीट आहे, असं म्हणता येईल. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीनं एकत्र जाऊन बघावा. संपूर्ण कुटुंबानं हा चित्रपट बघावा. चित्रपट बघताना असं वाटतं एका गावात चुकून कॅमेरा गेला आहे. चित्रपटात खूप हळव्या भावना आहेत. "


 सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी नाळ-2 या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जितेंद्र जोशी, श्रीनिवास पोकळे दीप्ती देवी आणि नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 'नाळ' (Naal) हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता नाळ-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  'डराव डराव', 'भिंगोरी' या नाळ-2 या चित्रपटातील गाण्यांचे देखील अनेकांनी कौतुक केलं आहे.


संबंधित बातम्या:


Naal 2 Teaser: नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2' चा टीझर पाहिल्यानंतर जितेंद्र जोशी म्हणाला, "बोल गं बाई त्याच्याशी..."; पोस्टनं वेधलं लक्ष