Musandi Marathi Movie: यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं, हे सांगणाऱ्या ‘मुसंडी’ (Musandi) या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी' हा मराठी चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन करणं महत्त्वाचं आहे. हे नियोजन कशाप्रकारे करावं हे सांगताना या परीक्षेतल्या अपयशाकडेही सकारात्मक दृष्टीने पहात जिद्दीने यश मिळवता येऊ शकते हे सांगणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. वेगळ्या विषयासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
'मुसंडी' चित्रपटाच्या पोस्टर अनावरणावेळी राज्याचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre), मंत्री उदय सामंत (Uday Samant), मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod), मंत्री गुलाबराव पाटील (Gulab Raghunath Patil), रामदास कदम (Ramdas Kadam), अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, मा. शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ), आमदार सुहास कांदे (Suhas Kande), आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat), आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil), आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule), आमदार शांताराम मोरे (Shantaram More), आमदार बालाजी कल्याणकर आणि चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे हे उपस्थित होते.
चित्रपटात 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी),सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत. राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाची कथा रचना करण्यात आली आहे. 'मुसंडी' चित्रपट 26 मे ला प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: