Munjya Box Office Collection Day 14:  आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा यांचा 'मुंज्या' (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सलग दोन आठवड्यांपासून 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसला झपाटले आहे. चित्रपट रिलीज झाल्याच्या 14 दिवसानंतरही 'मुंज्या'ची जोरदार कमाई सुरू आहे. रिलीजच्या दोन आठवड्यात चित्रपटाने दुप्पटीपेक्षाही अधिक कमाई केली आहे. 


'मुंज्या'ने पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढू लागला. कोणतीही मोठी स्टारकास्ट नसतानाही 'मुंज्या'ने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले. दुसऱ्या आठवड्यातील सुरुवातीच्या दिवसात चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 35 कोटींहून अधिक कमाई केली होती. 


'मुंज्या'ने रिलीजच्या 14 व्या दिवशी किती केली कमाई?



'मुंज्या'ने पहिल्याच दिवशी  4 कोटींची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात 'मुंज्या'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 35.3 कोटी रुपये होते. आता या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी 3.5 कोटी रुपये,  शनिवारी 6.5 कोटी, रविवारी 8.5 कोटी, सोमवारी 5.25 कोटी रुपये आणि दुसऱ्या मंगळवारी 3.4 कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या 13 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी 2.85 कोटी रुपयांची कमाई केली होती. गुरुवारीदेखील चित्रपटाने जोरदार कमाई केली. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, मुंज्याने  रिलीजच्या दुसऱ्या गुरुवारी प्राथमिक अंदाजानुसार, 2.50 कोटींची कमाई केली. मुंज्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 67.95 कोटींच्या घरात पोहचले आहे.







'मुंज्या' 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार?


'मुंज्या'ने आता आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जादू कायम आहे. आता 'मुंज्या' 100 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या क्लबमध्ये प्रवेश करणार का याकडे सिनेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.  


 'मुंज्या'च्या आधी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट आले होते. पण,त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.