Gandhi Godse Ek Yudh: दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा 'गांधी गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. नुकतंच मुंबईमध्ये (Mumbai) या चित्रपटच्या  स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंग दरम्यान काही लोकांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. चित्रपटाचा निषेध करणाऱ्यांचा असा आरोप आहे की, या चित्रपटामध्ये महात्म गांधींना कमी लेखण्यात आलं आहे. तसेच, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करण्यात आला आहे.


'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी देखील हजेरी लावली होती. अंधेरी परिसरातील एका चित्रपटगृहात चित्रपटाचे काही फुटेज आणि संवाद दाखवण्यात आले होते. त्या दरम्यान काही लोकांनी या चित्रपटाचा निषेध केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या स्क्रीनिंगला राजकुमार संतोषी यांच्यासोबत अभिनेता दीपक अंतानी आणि चित्रपटाचे सहयोगी निर्माता ललित श्याम टेकचंदानी हेही उपस्थित होते.


2 जानेवारी रोजी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरनं (Chinmay Mandlekar) प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधून राजकुमार संतोषी यांची मुलगी तनीषा संतोषीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात महात्म गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे. 






अभिनेता चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलं होतं की, 'युद्ध जारी' 26 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची चिन्मयचे चाहते उत्सुकतेने बघत आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी गोडसे एक युद्ध' वादाच्या भोवऱ्यात; राजकुमार संतोषी यांचा टीकाकारांना सल्ला, म्हणाले...