Shah Rukh Khan Tweet: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनेक शहरांमध्ये पठाणच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. शाहरुखचे चाहते पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. सांगलीमधील (Sangli News) शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपटाच्या एका शोचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली (Sangli) एसआरके युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे.
एसआरके (SRK) वासिम या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये काही मुलं हातात पठाण चित्रपटाची तिकीटं घेऊन पठाणच्या पोस्टरसमोर थांबलेली दिसत आहेत. या ट्वीटला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "सर, प्लिज हे पाहा, आम्ही पूर्ण ऑडिटोरियम बूक केलं आहे. पठाण चित्रपट बघण्यासाठी सांगली एसआरके युविव्हर्स तयार आहे.", या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो."
शाहरुखचे चाहते आता पठाणच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची जय्यत तयारी करत आहेत. SRK युनिव्हर्स हा शाहरुखचा फॅन क्लब भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करणार आहे.
पठाण हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी अनेक लोक करत होते. तसेच या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पादुकोणनं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगाचा देखील अनेकांनी निषेध केला पण आता या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: