Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याचे न्यूड फोटोशूट प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणी अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, रणवीरने दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. अखेर आज (29 ऑगस्ट) रणवीर सिंह पोलिसांसमोर हजर झाला आहे. चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंह याचा जबाब नोंदवला आहे.


अभिनेता आज (29 ऑगस्ट) चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 7 वाजता हजर झाला होता. यावेळी जवळपास दोन तास त्याची चौकशी आणि जबाब नोंदणी प्रक्रिया सुरु होती. यावेळी त्याची लीगल टीम देखील त्याच्या सोबत पोलीस स्टेशनला हजर होती. या दरम्याने त्याने पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विदेशी कंपनीसोबत या फोटोशूटसंदर्भात झालेल्या काँट्रॅक्टची माहिती देखील रणवीर सिंहने (Ranveer Singh) पोलिसांना दिली. याशिवाय येत्या काळातही गरज पडल्यास पोलिसांना सहकार्य करण्याचं आश्वासन अभिनेत्याने दिलं आहे.



नेमकं प्रकरण काय?


अभिनेता रणवीर सिंहने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केले होते. रणवीर सिंहला अनेकदा आगळ्या वेगळ्या अथवा अतरंगी कपड्यात पाहिलं असेल. पण, त्याने केलेल्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या फोटोमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश गालीच्यावर विविध पोज देताना दिसला होता. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित होत्या. पेपर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने त्याच्या चित्रपट आणि फॅशनबाबत चर्चा केली होती.


कोणी केली होती तक्रार?


एका सामाजिक संस्थेचे प्रमुख ललित श्याम यांनी मुंबईच्या चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) विरोधात गुन्हा दाखल केला होता. रणवीर सिंहचं फोटोशूट हे महिलांच्या मनाता लज्जा निर्माण करणारे आहे. यामुळे महिलांच्या भावना दुखावतील, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे रणवीरने ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवरुन हे फोटो हटवावेत, अशीही मागणी ललित श्याम यांनी केली होती.


ललित श्याम यांच्या तक्रारीनंतर न्यूड फोटोसेशन करणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह याच्याविरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी कायद्याच्या कलम 67 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात त्याची चौकशी करण्यात आली.


संबंधित बातम्या


Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ 


Nude Photoshoot Controversy : न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहला मुंबई पोलिसांची नोटीस, लवकरच चौकशीला हजर राहावे लागणार