या सिनेमाचा सहनिर्माता असलेल्या जॉनला त्याच्या या प्रोजेक्टमधील अन्य भागिदारांनी कोर्टात खेचलं आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी जॉन अब्राहम स्वत: मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात हजर होता.
क्रिअर्ज एंटरटेन्मेंट यांनी जॉन अब्राहम एंटरटेन्मेंट विरोधात आर्थिक विवादाच्या मुद्यावरुन हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे.
अभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईत तक्रार
या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या प्रसिद्धीसाठी झालेल्या करारानुसार दहा कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून जॉनने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नकार दिला होता. मात्र मंगळवारी त्यांनी जॉनला या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी ठरलेल्या रकमेतील पाच कोटी रुपये येत्या शुक्रवारपर्यंत देण्याचं कबूल केलं.
4 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या परमाणू या सिनेमात जॉन अब्राहम मुख्य भुमिकेत आहे. वाद मिटल्यानंतर या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी जेमतेम दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक राहील, जो फारच कमी पडणार आहे. त्यामुळे जॉनच्या अन्य भागीदारांनी याला विरोध करत हायकोर्टानं प्रसिद्धीसाठी अधिक वेळ मिळवून द्यावा अशी विनंती कोर्टाकडे केली.