Fighter Song Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' (Fighter) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'इश्क जैसा कुछ' (Ishq Jaisa Kuch) असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात हृतिक-दीपिकाची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.


'फायटर' या सिनेमातील दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांचे रोमँटिक सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'इश्क जैसा कुछ' हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यातील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


'इश्क जैसा कुछ' अप्लावधीतच व्हायरल


रोमँटिक ट्रेक, हृतिक-दीपिकाची जोडी, चांगलं लोकेशन आणि उत्तम संगीत अशा सर्व गोष्टी 'इश्क जैसा कुछ' या गाण्यात जुळून आल्या आहेत. विशाल-शेखर, शिल्पा राव आणि मेलो डी यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. जो कुमार, मेलो डी आणि विशाल ददलानी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर विशाल आणि शेखर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 






'फायटर' कधी होणार रिलीज? (Fighter Release Date)


'फायटर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद यांनी सांभाळली आहे. वायकॉम 18 स्टुडिओ आणि मार्फ्लिक्स फिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.


भारतीय वायुसेनावर आधारित 'फायटर' हा सिनेमा आहे. हृतिक रोशन आणि दीपिका या सिनेमात IAF वैमानिक झाली आहे. हा एरियल अॅक्शनपट असणार आहे. 'इश्क जैसा कुछ' या गाण्यातील हुक स्टेपदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. रिलीज होताच हे गाणं 31 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. 'फायटर' या सिनेमात हृतिक-दीपिकासह अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


Fighter Song Out : 'फायटर' सिनेमातील पहिलं गाणं आऊट! 'शेर खुल गए'मध्ये दिसला हृतिक-दीपिकाचा रोमँटिक अंदाज