Ananya Pandey : अनन्या पांडे जेव्हा काल एनसीबी कार्यालयात आली तेव्हा तिच्या सोबत तिचे वडील चंकी पांडे सुद्धा होते चंकी पांडे यांना बाहेर बसवण्यात आला आणि अनन्या पांडेची चौकशी विश्व विजय सिंग,समीर वानखेडे आणि एक महिला अधिकारी या तिघांनी सुरू केली. अनन्या पांडे ने एनसीबीला सांगितले कि, 'मी आर्यन खान सोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. तसेच आर्यनची बहीण सुहाना खानची सुद्धा जवळची मैत्रीण आहे. ज्यामुळे आर्यन खान आणि सुहाना आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. शूटिंग मधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही सगळे भेटतो त्यामध्ये आमच्या शाळेतील मित्र सुद्धा असतात.'


वीड (weed) संदर्भात अनन्या म्हणाली...
वीड संदर्भात जेव्हा अनन्या पांडे ला विचारण्यात आलं तेव्हा तिने आपण कुठल्याही प्रकारची ड्रग्स घेत  नाही तसेच कधी सप्लायही केलं नसल्याचं एनसीबीला सांगितले. वीड संदर्भात झालेल्या चॅट बद्दल अनन्या ने एनसीबी ला सांगितलं की, 'त्या वेळेला सिगरेट आनन्यावरून हे चॅट झाले होते. मात्र खूप वर्षांपूर्वीचे चॅट असल्यामुळे नीट आठवत नाही मात्र वीड हे एका प्रकारचे ड्रग्स आहे हे मला माहिती नाही.'


2018-19 मधील आर्यन खानसोबत झालेल्या चॅटमुळे अनन्या पांडे एनसीबीच्या चौकशीच्या भोवर्‍यात आली आहे. दोन वेळा आर्यनसोबत वीड सप्लायबद्दल झालेल्या चॅटमध्ये अनन्या पांडेचे नावं समोर आले. अनन्या पांडेचे दोन फोन एनसीबी ने जप्त केले आहेत, एव्हीडेन्स टेम्परिंग होऊ नये म्हणून अनन्या पांडेचा एक जुना फोन आणि आता नवीन घेतलेला फोन जप्त केला आहे. ड्रग्स सेवन केल्यास संदर्भातील सुद्धा एनसीबी अनन्या पांडेला प्रश्न विचारनार असून अनन्या प्रश्नांची उत्तरे देण्यात असमर्थता दाखवत होती. 


काल 4 तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा Ananya Pandey ला समन्स, आणखी काही बॉलिवूड स्टार अडकणार?


आर्यन खान च्या मोबाईलमधून जे चॅट सापडले आहेत त्या प्रकरणात अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसी बीने बोलावलेला. एनसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2018-19 मध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे काही चॅट झाले होते त्यामध्ये ड्रग्स  सप्लाय संदर्भात काही चॅट आहेत, ज्यामध्ये आर्यन खान ने अनन्या पांडेला एका ड्रग्स सप्लायरचा नंबर सुद्धा दिला आहे. एनसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान ने अनन्या पांडेला दोन वेळा स्वतःच्या सेवनासाठी वीड म्हणजेच गांजा आणण्यासाठी सांगितलं होतं आणि दोन ड्रग्स सप्लायरचे नंबर सुद्धा दिले होते.ज्यानंतर अनन्याने हे ड्रग्स आर्यन पर्यंत पोचवले सुद्धा होते. याशिवाय आर्यन खान आणि अनन्या पांडे आपल्या मित्रांसोबत एका गेट-टुगेदर मध्ये जेव्हा भेटणार होते त्यावेळी सुद्धा आर्यनने अनन्याला वीड आणल्याचे व्हाट्सअप चॅट मध्ये सांगत आहे, या चॅटमध्ये अनन्या आर्यनला सांगते की, तिने आधी सुद्धा ट्राय केला आहे आणि तिला पुन्हा ट्राय करायचा आहे.


स्टार किड असण्याचा फायदा होतो? अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया म्हणते...