Sudha Chandran : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुधा यांनी विमानताळावर त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले आहे.  सुधा चंद्रन यांनी अपघातामध्ये त्यांचा पाय गमावला. त्यानंतर त्यांना कृत्रिम पाय  (artificial limb)  बसवण्यात आला. पण जेव्हा त्या काही कामानिमित्त विमानाने प्रवास करतात तेव्हा त्यांना विमानतळावर अडवले जाते आणि त्यांना त्यांचा कृत्रिम पाय काढायला लावतात. यासर्व गोष्टीमध्ये सुधारणेची मागणी करत सुधा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला.    


सुधा चंद्र या व्हिडीओमध्ये म्हणाल्या, 'ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, मी तुम्हाला मी सांगू शकते की मी नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. मी कृत्रिम पाय असून देखील डान्स करून इतिहास रचला. अनेक वेळा माझ्या कलेने मी माझ्या देशाचे नाव उंचावले. मी माझ्या कामानिमित्त जेव्हा बाहेर विमानाने प्रवास करते तेव्हा अनेक वेळा मला विमानतळावर अडवले जाते. मला माझ्या कृत्रिम पायामुळे माझी ईटीडी टेस्ट केली जाते. त्यासाठी मला माझा पाय काढावा लागतो. हे योग्य आहे का?' हा व्हिडीओ शेअर करून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले, 'हे खूप वेदना देणारे आहे. यावर सुधारणा होईल, अशी अशा आहे.' सुधा यांच्या या पोस्टला करणवीर बोहरा आणि अदा खान या कलाकारांनी कमेंट केल्या. तसेच अनेक नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून दिल्या. 






Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात रंगतोय 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' कॅप्टनसी टास्क, स्पर्धक आखत आहेत रणनीती


एका मुलाखतीमध्ये सुधा यांनी सांगितले होते की,  एकदा कुटुंबासोबत बसमध्ये प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्यांना पाय गमवावा लागला. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. पण  गॅंगरिन झाल्याने त्यांना पाय कापावा लगला. त्यानंतर त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला.  


Oscars 2022 : शेरनी अन् सरदार उधम सिंह दोन बॉलिवूडपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट