Mumbai 1993 Serial Bomb Blast : 1993 मध्ये याच दिवशी एकामागून एक अनेक बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती. 12 मार्च 1993 रोजी 2 तास 10 मिनिटांत मुंबईत विविध ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरले. यामध्ये 257 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले. मुंबईतील या बॉम्बस्फोटांची व्यथा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.


1. बॉम्बे (Bombay :1995)
मुंबई बॉम्बस्फोटांवर बनलेल्या चित्रपटांच्या यादीत पहिले नाव ‘बॉम्बे’ या चित्रपटाचे येते. 1995 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने तमिळ, तेलगू आणि हिंदी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. या चित्रपटात 1992 आणि त्यानंतर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाची कथा दाखवण्यात आली आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. तसेच या चित्रपटाला 10 हून अधिक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. 'बॉम्बे' चित्रपटात अरविंद स्वामी आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होते.



2. ब्लॅक फ्रायडे (Black Friday : 2004)
'ब्लॅक फ्रायडे' हा चित्रपट हुसैन झैदी यांच्या 'ब्लॅक फ्रायडे : द ट्रू स्टोरी ऑफ द बॉम्बे ब्लास्ट्स' या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. 1993 च्या बॉम्बस्फोटाची भीषणता या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात के. के. मेनन, आदित्य श्रीवास्तव, पवन मल्होत्रा, किशोर कदम आणि झाकीर हुसैन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. बॉम्बस्फोटांचे वास्तव चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच सेन्सॉरला हा चित्रपट मंजूर करण्यासाठी दोन वर्षे लागली.




3. मुंबई मेरी जान (Mumbai Meri Jaan : 2008)
हा चित्रपट 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांवर आधारित नसून या चित्रपटात मुंबईतील इतर बॉम्बस्फोटांच्या वेदनाही दाखवण्यात आल्या आहेत. 'मुंबई मेरी जान' हा चित्रपट 11 जुलै 2006 रोजी मुंबईत झालेल्या ट्रेन बॉम्बस्फोटांवर आधारित आहे. स्फोटानंतरची परिस्थिती चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. 



4. द अटैक्स ऑफ 26/11 (The Attacks of 26/11 : 2013)
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत तिसरा मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानचे काही दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले आणि त्यांनी सगळीकडे दहशत पसरवली. तीन दिवस मुंबई दहशतवाद्यांच्या ताब्यात होती. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या 'द अटॅक ऑफ 26/11' या चित्रपटात या दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवली आहे. हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला. नाना पाटेकर आणि संजीव जयस्वाल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले.



महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha