Mumbai : चित्रपट (Movies) आणि नाटकांचा (Drama) मोठा चाहतावर्ग आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसीरिज रिलीज होत असल्या तरी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याची आणि नाट्यगृहात जाऊन नाटकाचा प्रयोग पाहायची मजा काही औरच आहे. पण आता मुंबईकरांसाठी (Mumbai) मनोरंजन (Entertainment) महाग होणार असल्याचं म्हटलं जात आहे.


मुंबईकरांसाठी मनोरंजन होणार महाग


मुंबईत नित्यनियमाने नाटक आणि सिनेमा पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पण नव्या वर्षात नाटक-सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुंबई महापालिकेने रंगभूमी करात वाढ केलेली नाही. पण आता 13 वर्षानंतर पालिका या करात वाढ करण्याचा विचार करीत आहे.


मुंबई महापालिकेने गेल्या 13 वर्षापासून रंगभूमी करात वाढ केलेली नाही. त्यामुळे 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे. तसेच हा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार वातानुकूलित चित्रपटगृहांतील प्रत्येक प्रयोगाला 60 वरुन 200 रुपये, तर विनावातानुकूलित चित्रपटगृहांसाठी प्रत्येक शोचे कर हे 45 वरुन 90 रुपये होणार आहेत. 


नाटकांच्या प्रत्येक प्रयोगावरील 25 रुपये कर 100 रुपये होण्याची शक्यता आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सिंगल स्क्रीनच्या तुलनेत अद्ययावत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता 13 वर्षानंतर पालिका या करात वाढ करण्याचा विचार करत आहे.


प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?


'राष्ट्रीय चित्रपट दिनी' (National Film Day) हेमंत ढोमेने प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? असं म्हणत एक खास पोस्ट लिहिली होती. त्यावेळी 75 रुपयांत सिनेमे दाखवण्यात आले होते. त्यावेळी सिनेप्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर हेमंत ढोमे म्हणाला होता,"आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी 75 रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात?". 
मनोरंजन क्षेत्रातील महागाईचा रसिक प्रेक्षकांना मोठा फटका बसणार आहे.






संबंधित बातम्या


Majha Katta : सात वर्षांचा प्रवास, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या समाजकार्याची गोष्ट, सत्यशोधकच्या निमित्ताने संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे 'माझा कट्ट्या'वर