Mukesh Khanna on Adipurush : 'आदिपुरुष'चा (Adipurush) टीझर रिलीज झाल्यानंतर सुरू झालेल्या वादात नेत्यांनंतर आता कलाकारांकडून प्रतिक्रिया येत आहेत. 'रामायण' (Ramayan) या प्रसिद्ध मालिकेमध्ये ‘भीष्म’ साकारणाऱ्या मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी आता या टीझरबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि चित्रपटाच्या कलाकारांपासून ते निर्मात्यांपर्यंतच्या संपूर्ण वादावर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मुकेश खन्ना म्हणाले की, 'जेव्हा सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारताना म्हटले होते की, मला या पात्राला विनोदाची किनार द्यायची आहे, तेव्हा मी त्यावरही माझी प्रतिक्रिया दिली होती. अशाप्रकारे धर्माची खिल्ली उडवणारे तुम्ही कोण?’
आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करताना मुकेश खन्ना म्हणाले की, ‘चित्रपटात रामची भूमिका साकारणारे ना रामसारखे दिसत आहेत आणि ना हनुमान साकारणारे हनुमानासारखे दिसत आहेत. रावणही रावणसारखा दिसत नाहीये. मग हे रामायण कोणते? हा मुघल काळातील चित्रपट वाटतो. तुम्ही आमच्या धर्माची चेष्टा करत आहात, हे स्पष्ट आहे. आधीच सगळीकडे चित्रपटांवर बहिष्कार घातला जात असताना, तुम्ही पुन्हा नवा वाद निर्माण करत आहात. यामुळे लोक पुन्हा तुमच्यावर टीका करतील. मग, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत तुम्ही त्याचा बचावही कराल.’
प्रेक्षकांनी विश्वास दाखवला नाही तर...
'रामायणा’बद्दल प्रत्येक भारतीयाची एक खास धारणा आहे. लोकांच्या मनात असलेल्या भगवान श्रीरामांच्या चेहऱ्यावर मिशी नव्हती. हनुमानही दाढी-मिशा नसलेले होते. रावणाला फक्त मोठी मिशी होती. पण, या चित्रपटात दोन्हीही गोष्टी उलट आहेत. तुम्ही या चित्रपटात 500 कोटींची गुंतवणूक करत असाल, पण जर लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला नाही, तर याचा काहीही फायदा होणार नाही, असे मुकेश खन्ना म्हणाले. आता तुम्ही म्हणाल की, हा टीझर आहे. हा वरचा लिफाफा असेल, तर चित्रपट कसा असेल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रामायण आणि महाभारत केवळ स्पेशल इफेक्टने बनवता येत नाहीत!
मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, 'भगवान रामाला मिशी असल्याचे दाखवण्यात आले आहे, लोक ते कितपत स्वीकारतील माहीत नाही. रावण तर खिलजीसारखा दिसत असल्याचे बोलले जात आहे. हे तर खरे आहे की, त्याला मुघलाचे स्वरूप देण्यात आले आहे. कुठे रामायण, कुठे ते मुघल रूप. तुम्ही गंमत करत आहात का? हे चालणार नाही. त्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येईल. रामायण आणि महाभारत केवळ स्पेशल इफेक्टने बनवता येत नाहीत.’
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: