Mukesh Ambani : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे देशातील लोकप्रिय उद्योगपती असण्यासोबत एक परफेक्ट 'फॅमिली मॅन'देखील आहेत. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. मुकेश अंबानी त्यांचा मुलगा आकाश अंबानीपेक्षा (Akash Ambani) सून श्लोका अंबानीवर (Shloka Mehta) जास्त विश्वास ठेवतात. आकाशने नुकताच याबद्दल खुलासा केला आहे.


अंबानी कुटुंबातील प्रत्येक जण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) हे त्यांच्या आकाश अंबानी (Akash Ambani) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) या दोन मुलांसह सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. या दोन मुलांसह श्लोका अंबानी (Shloka Ambani) आणि राधिका मर्चंटदेखील  (Radhika Merchant) आपल्या लूक्समुळे किंवा कामामुळे लाइमलाईटमध्ये असतात. पण रिलायंस इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी हे मुलगा आकाश अंबानीपेक्षा सून श्लोका अंबानीवर जास्त विश्वास ठेवतात. आकाशने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.


आकाश अंबानीने नुकतीच आयआयटी (IIT Bombay) मुंबईच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी तो म्हणाला,"माझे वडील मुकेश अंबानी यांनी मला इंजीनियरिंग करण्याचा सल्ला दिला होता. पण मी उद्योग या क्षेत्रात शिक्षण घेतलं. अशातच आयआयटी कॉलेजने मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं तेव्हा वडिलांचा यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी सून श्लोका मेहताचा विचारुन याबद्दल खात्री केली". 






श्लोकासोबत मुकेश अंबानींचं खास कनेक्शन


अंबानी कुटुंबियांची मोठी सून श्लोका मेहता ही रसल मेहता यांची मुलगी आहे. आकाश आणि श्लोका एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. श्लोकाच्या प्रेग्नंसीदरम्यान मुकेश अंबानी यांनी तिची खूप काळजी घेतली होती. त्यामुळे सुनेची काळजी घेतल्याने मुकेश अंबानी यांचं खूप कौतुक झालं होतं.


आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 2019 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका यांच्या मुलाचं नाव 'पृथ्वी' असं आहे. तर गेल्यावर्षी श्लोकाला एक मुलगी झाली आहे. या मुलीचं नाव 'वेदा' असं ठेवण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या


धीरुभाई अंबानी यांनी मुकेश आणि अनिल अंबानींसाठी किती संपत्ती ठेवली होती? जाणून घ्या सविस्तर माहिती