Mrunal Thakur Video : सेलिब्रिटींची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. आपल्या लाडक्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी अनेक चाहते वेगवेगळी शक्कल लढवतात. पण, अभिनेत्री मृणाला ठाकूरच्या चाहत्याने हद्दचं केली. या चाहत्याने मृणाल ठाकूरच्या फोटोशी चाहत्याने छेडछाड करत तिच्यासोबत स्वत:चा फोटो पोस्ट करत एडीट केला. यानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरने चाहत्याला चांगलंच झापलं. यानंतर मृणालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीच्या फोटो अन् व्हिडीओशी छेडछाड
अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मृणाल एका व्यक्तीसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहे. मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ चाहत्याने फोटोशॉप करत एडीट केला आणि तिथे स्वत:चा फोटो लावला. हा एटीडेट व्हिडीओ चाहत्याने इंटरनेटवर शेअर केला. ज्यानंतर तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर मृणाल ठाकूरने संताप व्यक्त करत चाहत्याला कडक शब्दाल झापलं.
मृणाल ठाकूरने चाहत्याला कडक शब्दात झापलं
अभिनेत्री मृणाल ठाकूरचा दिवाळी सेलिब्रेशनचा एक फोटो एडिट करुन चाहत्याने व्हिडीओ बनवत पोस्ट केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मृणाल भडकली आणि तिने कमेट करत चाहत्याला झापलं. मृणाल ठाकूरने कमेंटमध्ये लिहिलं की, "भाऊ, तू स्वत:चं खोटं सांत्वन का करत आहेस? तू जे करत आहेस ते छान वाटतंय ना? नाही!" दरम्यान, यानंतर नेटकऱ्यांनी त्या चाहत्यावर निशाणा साधला.
बच्चे की जान लोगे क्या...
मृणाल ठाकूरने काही तासांनंतर तिची कमेंट डिलीट केली आणि नंतर विनोदी पद्धतीने त्याची खिल्ली उडवली. या व्हिडीओवरुन वाद सुरू झाल्यानंतर, मृणालने ही व्हिडीओ पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आणि लिहिलं, 'आशा आहे की, एक दिवस तू चांगले चित्रपट एडिट करशील! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर आता, मृणाल ठाकूरने स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, "बच्चे की जान लोगे क्या...".
फोटोशॉपच्या वादावर मृणाल ठाकूरचं स्पष्टीकरण
मृणाल ठाकूर म्हणाली, "मित्रांनो, तुम्ही लोक त्या मुलाचा जीव घ्याल का? जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिलं, तेव्हा मला आनंद झाला की, मी कुणासोबत तरी दिवाळी साजरी करत आहे! मग मी त्याचं पेज उघडलं आणि मग मला दिसलं की, त्याने प्रत्येक अभिनेत्रीसोबत त्याचा व्हिडीओ एडिट केला होता! मग माझा हार्ट ब्रेक झाला, मला खूप वाईट वाटलं. पण, तो खरोखरच चांगलं एडिटिंग करतो आणि मी प्रार्थना करते की, त्याने त्याची कला योग्य गोष्टींसाठी वापरावी! त्याला वाईट बोलू नका. कदाचित त्याचा हेतू वाईट नव्हता".
महत्त्वाच्या इतर बातम्या :