Himansh Kohli Birthday:आपल्या करियरची सुरुवात टीव्हीपासून  करणारे अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये आहेत. हिमांश कोहली हा त्यांच्यातलाच एक अभिनेता ज्यानं मालिकांमध्ये काम करत नंतर फिल्मी दुनियेत प्रवेश केला. बॉलिवूडच्या यारियाँ या चित्रपटात दिसलेल्या हिमांश आणि बॉलिवूडच्या अनेक गाण्यांमध्ये पार्श्वगायन केलेली नेहा कक्कर यांचं अनेक वर्षे प्रेमप्रकरण सुरु होतं. हिमांश नेहाबद्दल खूप सिरियस असल्याचं त्यानं एका मुलाखतीतही सांगितलं होतं. पण नेहानं नंतर दिलेल्या एका मुलाखतीत हिमांशची ब्रेकअपची बातमी देत सगळ्यांनाच धक्का दिला होता.


हिमांश कोहलीने दिल्लीत रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने 'हमसे है लाइफ' या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.  3 नोव्हेंबर 1989 रोजी दिल्लीत जन्मलेला हा अभिनेता यारीयाँ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील आज ब्लू है पानी पानी गाण्यादरम्यान नेहा आणि हिमांश भेटले होते.


यारीया चित्रपटादरम्यान भेटले, प्रेमात पडले


यारियां चित्रपटातलं अल्पावधीतच फेमस झालेलं गाणं आज ब्ल्यू है पानी पानी च्या सेटवर नेहा आणि हिमांश एकमेकांना पहिल्यांदा भेटले. त्यांच्यात मैत्री झाली. कालांतरानं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी इंडियन आयडॉल 10 च्या सिंगिग शोच्या मंचावर एकमेकांच्या प्रेमाची कबूली दिली होती. साधारण 2-2.5 वर्ष एकमेकांसोबत असणाऱे नेहा आणि हिमांश आता लग्न करतील अशी त्यांच्या चाहत्यांना आशा होती. पण नेहा आणि हिमांशने त्यांच्या ब्रेकअपची बातमी देऊन चाहत्यांना आर्श्चर्याचा धक्काच दिला. 


सगळा वेळ त्या व्यक्तीला देत होते ज्याची लायकी नव्हती. 


हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नेहा कक्कर ने हिमांशबद्दल केलेल्या वक्तव्यानं चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. ती म्हणाली होती, मी खूप आनंदी गायिका आहे. जेंव्हा मी रिलेशनशीपमध्ये होतो, तेंव्हा मी माझ्या कुटुंबाला आणि मित्रांनाही वेळ देऊ शकत नव्हते. मी माझा सगळा वेळ त्या व्यक्तीला देत होते ज्याची लायकी नव्हती. एवढं करूनही तो मी त्याला वेळ देत नसल्याची तक्रार घेऊन यायचा असं नेहा म्हणाली होती. 


हिमांशला करायचे होते नेहाशी लग्न


बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हिमांशने तो नेहाबद्दल सिरियस असल्याचं म्हणाला होता. मी नेहाच्या बाबतीत गंभीर आहे. तिच्याशी मी लग्न करायचाही निर्णय घेतला होता. पण नेहानं ब्रेकअपचा निर्णय घेतला. मी फक्त तिचा निर्णय स्विकारला. त्यांचे ब्रेकअप कोणत्या कारणानं झालं हे कधी समजू शकले नसले तरी हिमांश आणि नेहा त्यांचे करियर पुढे नेण्यात व्यस्त असल्याचं दिसतं..