Movies Release on August : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्माते त्यांचे सिनेमे (Movies) प्रदर्शित करत आहेत. गेल्या काही महिन्यांत 'भूल भुलैया 2' सारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता ऑगस्ट महिन्यातदेखील अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


सिनेमाचे नाव : लाल सिंह चड्ढा
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार प्रदर्शित : 11 ऑगस्ट 2022


आमिर खान, करीना कपूरच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंम'चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वेत चंदनने सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आमिर गेल्या अनेक दिवसांनी सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे. 


सिनेमाचे नाव : रक्षाबंधन
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार प्रदर्शित : 11 ऑगस्ट 2022


अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष खूपच चांगले आहे. आतापर्यंत अक्षयचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर 'रक्षाबंधन' हा तिसरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रक्षाबंधन' सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केलं आहे. 


सिनेमाचे नाव : यशोदा
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 11 ऑगस्ट 2022


दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचा बहुचर्चित 'यशोदा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात समंथासोबत उन्नी मुकुंदन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हरेश नारायणने सांभाळली आहे. 


सिनेमाचे नाव : दे धक्का 2
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 5 ऑगस्ट 2022


'दे धक्का 2' हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसन प्रेक्षकांना भेटणार आहेत. 


सिनेमाचे नाव : एकदा काय झालं
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 5 ऑगस्ट 2022


'एकदा काय झालं' हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या 'एकदा काय झालं' या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. 


सिनेमाचे नाव : कार्तिकेय 2
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 12 ऑगस्ट


'कार्तिकेय 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, आदित्य मेनन, अनुपम खेर, हर्षा चेमुडू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चंदु मोनदेतीने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. 


सिनेमाचे नाव : लायगर
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 25 ऑगस्ट


'लायगर' सिनेमाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली असून पुरी जगन्नाथने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात विजयसह अनन्या पांडे आणि राम्या कृष्णनदेखील दिसणार आहे. 


सिनेमाचे नाव : डार्लिंग्स 
कुठे होणार रिलीज : नेटफ्लिक्स
कधी होणार रिलीज : 5 ऑगस्ट


'डार्लिंग्स' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. आलियसह या सिनेमात विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मैथ्यू, विक्रम, इयाना चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


सिनेमाचे नाव : हिट द फर्स्ट
कुठे होणार रिलीज : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
कधी होणार रिलीज : 15 ऑगस्ट


राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा 'हिट द फर्स्ट' हा सिनेमा 15 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 15 ऑगस्टला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. राजकुमार आणि सान्यासह या सिनेमात जतिन गोस्वामी, अखिल अय्यर, मिलिंज गुणाजी, शिल्पा शुक्ला आणि संजय नार्वेकर मुख्य भूमिकेत आहेत. 


सिनेमाचे नाव : शाबास मिथु
कुठे होणार रिलीज : नेटफ्लिक्स
कधी होणार रिलीज : 15 ऑगस्ट


भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित 'शाबास मिथु' हा सिनेमा आहे. या सिनेमात तापसी पन्नू मिताली राजच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Vikrant Rona Box Office Collection : किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'ने बॉक्स ऑफिसवर केली कमाल; 'शमशेरा' ठरला फ्लॉप


Liger Song Out : विजय देवरकोंडाच्या आवाजातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज; 25 ऑगस्टला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला