Vikrant Rona Box Office Collection Day 1 : गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा पहायला मिळत आहे. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपचा (Kichcha Sudeep) 'विक्रांत रोणा' (Vikrant Rona) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 28 जुलैला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 19.60 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे रणबीरचा 'शमशेरा' फ्लॉप ठरला आहे.
सिनेप्रेक्षकांमध्ये सध्या दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पाहायला मिळत आहे. हिंदी सिनेमांपेक्षा प्रेक्षक दाक्षिणात्य सिनेमांकडे पसंती दर्शवत आहेत. 'विक्रांत रोणा'च्या हिंदी वर्जनने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.3 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'विक्रम'पेक्षा 'विक्रांत रोणा' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे
'विक्रांत रोणा'ने कन्नडमध्ये केली सर्वाधिक कमाई
किच्चा सुदीपचा कन्नड अभिनेता आहे. त्यामुळेच 'विक्रांत रोणा'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी कन्नडमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 16.05 कोटींची कमाई केली आहे. तर तेलुगूमध्ये 1.6 कोटी, तामिळमध्ये 55 लाख तर मल्याळममध्ये 10 लाखांची कमाई केली आहे. थरार-नाट्य असणारा हा सिनेमा विकेंडला आणखी जास्त कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
'विक्रांत रोणा'ची 'एक विलेन रिटर्न्स' सोबत टक्कर
'विक्रांत रोणा' आणि 'एक विलेन रिटर्न्स' बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले आहेत. दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे आता कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो हे पाहावे लागेल. 'एक विलेन रिटर्न्स' या सिनेमात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 'एक विलेन'चा सीक्वल आहे.
'विक्रांत रोणा' हा सिनेमा 95 कोंटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमाने 150 कोटींचा आकडा पार करावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे. अनूप भंडारी लिखित, दिग्दर्शित या सिनेमात निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते.
संबंधित बातम्या