Most Awaited Movie In 2025: नव्या वर्षाची चाहूल लागली असून 2024 वर्ष सरत आलं आहे. आम्ही 2025 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये सलमान खानचा (Salman Khan) सिकंदर (Sikander), रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) पीरियड ड्रामा असलेला रामायण (Ramayan), हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआरचा थ्रिलर वॉर 2, चित्रपट निर्माता-अभिनेता जोडी रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा गोलमाल 5 आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.


1. सिकंदर: ॲक्शन थ्रिलर असलेल्या सिकंदरमध्ये सलमान खान दिसणार आहे. रश्मिका मंदान्ना आणि सुनील शेट्टीही या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार, हा चित्रपट 2025 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, एआर मुरुगादास लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचं बजेट 400 कोटी रुपये आहे. या चित्रपटात सलमान खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.






2. रामायण: नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या रामायणमध्ये रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो प्रभू राम आणि महर्षी परशुराम या दोघांची भूमिका साकारणार आहे. साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. कन्नड सुपरस्टार यशला रावणाची भूमिका मिळाली आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, रामायण 2025 च्या अखेरीस थिएटरमध्ये येण्याची अपेक्षा आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट 835 कोटी रुपये आहे.


3. वॉर 2: IMDb नुसार, 2019 च्या ब्लॉकबस्टर वॉरचा सिक्वेल, अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. या चित्रपटात हृतिक रोशन, जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असणार आहेत. वॉर 2 हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे.


4. अल्फा: या महिन्याच्या सुरुवातीला, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा सातवा चित्रपट अल्फा 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आलिया भट्ट आणि शर्वरी मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट स्पाय युनिवर्समधला पहिला वुमन ओरिएंटेड चित्रपट आहे. शिव रवैल या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या मते, अल्फामध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील दिसणार आहेत, तर हृतिक रोशन कॅमिओमध्ये दिसणार आहे.


5. गोलमाल 5: टाईम्स ऑफ इंडियानुसार, रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल 5, दिवाळी 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या कॉमेडी चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे दिसणार आहेत.


6. भूत बांगला: हॉरर-कॉमेडी भूत बांगला हा अभिनेता-दिग्दर्शक जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांचा 14 वर्षांतील पहिला चित्रपट आहे. याआधी त्यांनी हेरा फेरी, भूल भुलैया, गरम मसाला आणि भागम भाग सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा बॉलिवूड चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.


7. स्काय फोर्स: स्काय फोर्स अभिषेक, अनिल कपूर आणि संदीप केवलानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला एक वॉर ड्रामा आहे. यामध्ये अक्षय कुमार, निम्रत कौर आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात भारताचा पहिला आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ला दाखवला जाणार आहे, जो 1965 च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर प्रत्युत्तर म्हणून केलेला हल्ला होता. हा चित्रपट 25 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे.


8. हाऊसफुल 5: गेल्या महिन्यात चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला यांनी हाऊसफुल 5 मध्ये झळकणाऱ्या कलाकारांचा खुलासा केला. त्यात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंह, सौंदर्या शर्मा, संजय दत्त, रितेश देशमुख, बोमन इराणी आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी रिलीज होणार आहे.


9. जॉली एलएलबी 3: कोर्टरूम कॉमेडी-ड्रामा फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परत आली आहे. सुभाष कपूर याचं दिग्दर्शन करणार आहेत. अक्षय कुमार, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला मागील भागांमधून त्यांच्या भूमिका पुन्हा करताना दिसतील तर सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि आशिष चौधरी देखील कलाकारांमध्ये सामील होतील. IMDb नुसार, हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.


10. लाहोर 1947: आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली येत असलेला लाहोर 1947 हा एक ऐतिहासिक ड्रामा आहे, जो राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवला जात आहे. यामध्ये सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट असगर वजाहत यांच्या जून लाहोर नई वेख्या ओ जम्या नई या नाटकापासून प्रेरित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


11. Raid 2: इंडिया टुडे नुसार, Raid 2, 2018 च्या हिट Raid चा सिक्वेल आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. राज कुमार गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात अजय देवगण आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. 


(वरील यादी मीडिया रिपोर्ट्सनुसार, देण्यात आली आहे. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही...)