Asha Parekh : बॉलिवूड अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. आता आशा पारेख यांना मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं (Dada Saheb Phalke Award 2022) सन्मानित करण्यात येणार आहे. अनुराग ठाकूर यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे.


आशा पारेख यांचं फिल्मी करियर


आशा पारेख यांनी 60-70 च्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अनेक गाजलेल्या सिनेमांत त्या झळकल्या आहेत. त्यांनी 95 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. 60-70 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आशा पारेख यांचं नावं आवर्जुन घेतलं जायचं. 1992 साली त्यांना मानाच्या पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. 


आशा पारेख यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यानंतर 'त्यांनी दिल देके देखो', 'जब प्यार किसीसे होता है', 'तिसरी मंझील' अशा लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. 1971 साली प्रदर्शित झालेल्या 'कटी पतंग' या सिनेमासाठी आशा पारेख यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरवण्यात आले. 






आशा पारेख यांचे गाजलेले सिनेमे


आशा पारेख यांनी 'जब प्यार किसी से होता है' (1961), 'फिर वही दिल लाया हूं' (1963), 'तिसरी मंजिल' (1966), 'बहारों के सपने' (1967), 'प्यार का मौसम' (1969), 'कटी पतंग' (1970) आणि 'कारवं' (1971), 'मंजिल मंजिल' (1984) अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. 


आशा पारेख यांना असा मिळाला पहिला सिनेमा - 


आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख या आशा यांना नृत्य शिकण्यासाठी शिकवणीला पाठवत होत्या. त्यावेळी दिग्दर्शक बिमल रॉय यांनी एका समारंभात आशा यांचे नृत्य पाहिले. त्यावेळी आशा यांचे वय दहा वर्ष होते.


आशा पारेख सध्या काय करतात? 


आशा पारेख सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत. अभिनेत्री असण्यासोबत त्या उत्तम नृत्यांगनादेखील आहेत. बालपणी त्यांनी अनेक सिनेमांत डान्स केला आहे. आशा पारेख सध्या मुंबईत डान्स क्लास घेतात. तसेच त्या सांता क्रूझ येथील एका रुग्णालयातदेखील काम करतात. 


संबंधित बातम्या


Dada Saheb Phalke Award: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर