Maine Payal Hai Chhankai : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) यांच्यात एका रिमिक्स गाण्यावरून वाद सुरू आहेत. नुकतेच नेहाने फाल्गुनी पाठक यांच्या 'मैने पायल है छनकाई...' (Maine Payal Hai Chhankai ) या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन रिलीज केले आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून फाल्गुनी पाठक तिच्यावर सतत टीका करत आहेत. दोघांमधील या शीतयुद्धात आता कोरिओग्राफर धनश्री वर्माही उतरली आहे. नेहा कक्करने गायलेल्या या रिमिक्स गाण्यात धनश्री वर्मा (Dhanashree Verma), प्रियांक शर्मासोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत या गाण्यावरून झालेल्या वादावर धनश्रीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.


नेहा कक्करने फाल्गुनी पाठक यांच्या 'मैने पायल है छनकाई...' या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन गायले आहे, ज्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आणि फाल्गुनी पाठक तिच्यावर खूप संतापले आहेत. फाल्गुनी पाठक म्हणाल्या की, जर त्या कायदेशीर कारवाई करू शकत असत्या, तर त्यांनी केली असती. मात्र, त्यांच्याकडे याचे अधिकार नाहीत.’


धनश्री म्हणते...


या वादावर आता धनश्री वर्मा हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. धनश्री वर्मा म्हणाली, ‘आम्हा सर्वांना हे गाणे आवडते. ते ऐकतच आपण मोठे झालो आहोत. जेव्हा आम्हाला कळले की, ते पुन्हा तयार केले जात आहे, तेव्हा आम्ही खूप उत्साहित झालो होतो. कारण आम्हाला माहित आहे की, हे गाणे सर्वांना आवडते आणि जर तुम्ही ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलात तर, त्यांना आणखी आवडेल. आमचे संगीतकार तनिष्क बागची, नेहा आणि जानी, या सर्वांनी मिळून ते आणखी छान बनवले आहे. आम्ही या गाण्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.’


रिमिक्स व्हर्जन मूळ गाण्यापेक्षा चांगले : धनश्री वर्मा


धनश्री वर्माने नेहा कक्करचे रिमिक्स व्हर्जन मूळ गाण्यापेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे. या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. तर, हे गाणे जानी यांनी लिहिले आहेत. या गाण्यात केवळ हुक लाईन मूळची वापरण्यात आली आहे. हे गाणे ऐकल्यानंतर सोशल मीडिया युजर्स म्हणत आहेत की, नेहा कक्करने पुन्हा एकदा एक आयकॉनिक गाणे खराब केले आहे. फाल्गुनी पाठक यांनीही त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, धनश्री आणि प्रियांकला वाटते की, तनिष्क आणि नेहाने या गाण्याला न्याय दिला आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: