Rajkummar Rao Film Monica O My Darling : राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. राजकुमार सध्या त्याच्या आगामी 'मोनिका ओ माय डार्लिंग' (Monica O My Darling) या सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 


'मोनिका ओ माय डार्लिंग' हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी (Huma Qureshi) आणि राधिका आपटेदेखील (Radhika Apte) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'मोनिका ओ माय डार्लिंग' हा डार्क-कॉमेडी सिनेमा आहे. 






'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमाच्या टीझरमध्ये हुमा कुरैशीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. हुमा तिचा हटके लुक फ्लॉन्ट करताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. रेट्रो लुकमध्ये हुमा डान्स करताना दिसून येत आहे. हुमा कुरैशी आणि राधिका आपटेचा ट्रेलरमधला अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'मोनिका ओ माय डार्लिंग'


'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. या सिनेमाचं कथानक रहस्यमय आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमात राजकुमार राव, हुमा कुरैशी, राधिका आपटेसह सिकंदर खेर आणि आकांक्षा रंजनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टीझर आऊट झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 


संबंधित बातम्या


Hit-The First Case : बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'हिट'ची जादू; पहिल्या वीकेंडमध्ये केली कोट्यवधींची कमाई


Rana Naidu teaser : राणा अन् व्यंकटेश दग्गुबातीची जोडी करणार पडद्यावर धमाल, ‘राणा नायडू’चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!