Mitali Mayekar: अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.  मिताली ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे. मितालीनं काही दिवसांपूर्वी बिचवरील तिच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल केलं. आता मितालीनं एक व्हिडीओ शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 


मितालीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बिचवर ब्लॅक कलरची साडी, मोकळे केस आणि कानात इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला मितालीनं कॅप्शन दिलं, 'ही गोष्ट लक्षात ठेवा की,  माझी मुळे मी कधीच विसरले नाही आणि कधीही विसरणार देखील नाही, मी काहीही परिधान केले तरी. अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा.' मितालीच्या या व्हिडीओला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केले. 


नेटकऱ्याची कमेंट


मितालीनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मराठी संस्कृती तुमच्या बुद्धीच्या आकलनाच्या फार पलिकडे आहे. नका असे प्रयत्न करू. बरं तू बिकिनी घाल की, नको घालू हा सुद्धा मुद्दा नाही. तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर दुसऱ्या कुणी तिकडे तोंड उघडायची गरज देखील नाही. पण फक्त कुणी तरी काही तरी प्रोजेक्ट द्यावा या आशेने अंगप्रदर्शन करणाऱ्या सो कॉल्ड मराठी अभिनेत्रींची इथे कमी देखील नाही."


मितालीनं नेटकऱ्याच्या या कमेंटला रिप्लाय दिला, "संस्कृती आणि काम, कसं आत्मसात करायचं याचे क्लासेस घेता का तुम्ही काकू? प्लीज घ्या. मला आवडेल जॉइन करायला." मितालीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे. तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. मितालीनं काही दिवसांपूर्वी तिच्या फॉरेन ट्रीप्सचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. मितालीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Mitali Mayekar: मिताली मयेकरचा बिकिनी लूक चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाली, 'आपली संस्कृती...'