Ekta Kapoor: मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध निर्मिती एकता कपूरचा (Ektaa Kapoor) थँक्यू फॉर कमिंग (Thank You For Coming) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामुळे एकता सध्या चर्चेत आहे. थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाचं काही लोकांनी कौतुक केलं तर काही लोकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं A सर्टिफिकेट दिलं आहे. आता ट्विटरवर एका नेटकऱ्यानं "अडल्ट चित्रपट बनवणं बंद कर!", असा सल्ला एकता कपूरला दिला आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटला एकता कपूरनं रिप्लाय दिला आहे.
"अडल्ट चित्रपट बनवणं बंद कर!" असा सल्ला एका नेटकऱ्यानं एकता कपूरला ट्विटरवर दिला आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटला एकतानं रिप्लाय दिला, "नाही, मी अडल्ट आहे, म्हणून मी अडल्ट चित्रपट बनवणार" एकताच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
"आप और करण जोहरने पुरे इंडिया को बिगाड़ा, आप दोनों की वजह से इंडिया में ज्यादा डिवोर्स होने लगे है" असं ट्वीट देखील एका नेटकऱ्यानं केलं. या ट्वीटला एकतानं रिप्लाय दिला, "Hmmmmmmm"
शोभा कपूर, अनिल कपूर; एकता कपूर; रिया कपूर यांनी थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला, शिबानी बेदी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. थँक यू फॉर कमिंग या चित्रपटानं ओपनिंग-डेला जवळपास 1.06 कोटींची कमाई केली आहे. करण बुलानी यांनी थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
जाणून घ्या एकता कपूरबद्दल
एकताने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. एकताने 1994मध्ये वडिलांच्या मदतीने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सुरुवात केली. 1995मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली एकताची पहिली मालिका 'पडोसन' तयार झाली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Thank You For Coming : भूमी पेडणेकरचा 'थँक्यू फॉर कमिंग' कसा आहे? जाणून घ्या...