Ganapath trailer Out: अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff)  'गणपत: अ हिरो इज बॉर्न' (Ganapath) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन (Kriti Sanon) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गणपत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अॅक्शन मोडमध्ये  दिसत आहेत. तर बिग बी यांच्या ट्रेलरमधील लूक्स आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


'एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो अमर होगा, वो अमीरों और गरीबों के बीच की दीवार गिराएगा...वो योद्धा मरेगा नहीं मारेगा' हा डायलॉग गणपत चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकू येतो.


गणपत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वीएफएक्स वापर करण्यात आला आहे. तसेच ट्रेलरमध्ये टायगर हा बॉक्सिंग करताना देखील दिसत आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये दिसते की, टायगर श्रॉफ म्हणतो, "आज से गुड्डू का चॅप्टर खत्म और गणपत का चॅप्टर शुरु". गणपत चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, या चित्रपटात लव्ह स्टोरी, अॅक्शन आणि ड्रामा या सगळ्याचा तडका असणार आहे. 


पाहा ट्रेलर:



गणपत कधी होणार रिलीज?


गणपत हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट  हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर यारियां 2 आणि टायगर नागेश्वर राव या दोन चित्रपटांबरोबर गणपत या चित्रपटाची टक्कर होणार आहे. गणपत या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






नऊ वर्षानंतर कृती आणि टायगर स्क्रिन करणार शेअर 


कृती आणि टायगर हे गणपत या चित्रपटाच्या माध्यमातून नऊ वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहेत. या दोघांचा हिरोपंती हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला होता. या  चित्रपटातील कृती आणि टायगर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता गणपत या चित्रपटामधील कृती आणि टायगरची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Ganapath Teaser Out:जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स; 'गणपत' चा टीझर आऊट, बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष