Mitali Mayekar: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. मिताली ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच मितालीनं तिचा स्पेनमधील एक खास लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला मितालीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
मितालीनं (Mitali Mayekar) तिचा स्पेनमधील (Spain) एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मिताली ही ओरेंज प्रिंटेड बिकीनी, मोठे इअरिंग्स आणि हातात ब्रेसलेट अशा लूकमध्ये दिसत आहे. मितालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'कमेंट्स सेक्शनमध्ये मला ‘आपली संस्कृती’ चे ज्ञान देण्याचा प्रयत्नही करू नका, तुम्हाला स्वत:चीच लाज वाटेल.' मितालीच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक केलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
'इथे बिकीनीबाबत अक्कल पाजळणारे लोक टीव्हीमध्ये लपून सगळं बघतात. तेव्हा यांची संकृती कुठे जाते काय माहित.' अशी कमेंट मितालीनं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं केली आहे. तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'असे कापडे घालायला संकृती नाही तर फिगर लागते. ज्यांच्याकडे फिगर नसते ते ट्रोल करतात. तिनं छान मराठमोळी पैठणी नेसून लग्न केला तेव्हा संस्कृती जपली, अशी कमेंट लोकांनी नाही केली. '
मिताली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 712K फॉलोवर्स आहेत. मितालीनं 2021 मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि मिताली हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
मितालीचे चित्रपट आणि मालिका
स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे. तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. मितालीच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
PHOTO: मितालीच्या निखळ हास्याने जिंकली चाहत्यांची मनं!