Shweta Tripathi Birthday Special : बहुप्रतिक्षित वेब सीरीज मिर्झापूर 3 (Mirzapur 3) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 5 जुलैपासून ही बहुप्रतिक्षित मिर्झापूर 3 सीझन ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर मिर्झापूरचे तिन्ही सीझन पाहू शकतात. अनेक जण तिन्ही सीझन बिंज वॉच करताना दिसत आहेत. या सीरीजमध्ये गोलूची भूमिका अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने साकारली आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठी मिर्झापूर व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकली आहे.


मिर्झापूर 3 मधील 'गोलू'चा वेगळा चाहतावर्ग


मिर्झापूर वेब सीरीजमुळे अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिची क्यूट अशी इमेज चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने ओटीटीसोबत चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठी ओटीटी प्लॅटफॉर्मसह मोठ्या पडद्यावरही पकड आहे.  मिर्झापूर 3 च्या गोलूने बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता विकी कौशलसोबत रोमान्सही केला आहे. 


चित्रपट फ्लॉप पण प्रेक्षकांच्या मनाला भिडला


अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिची अभिनयात चांगली पकड आहे. कोणत्याही भूमिकेला ती आपलीशी करून घेते. श्वेता त्रिपाठी गेल्या अनेक वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय असून चित्रपट तसेच जाहिरांतीमध्येही झळकली आहे. पण तिला ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे नव्याने ओळख मिळाली आहे. 6 जुलै रोजी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचा 39 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने श्वेता त्रिपाठीबाबत काही माहिती जाणून घ्या.






कोण आहे श्वेता त्रिपाठी?


श्वेता त्रिपाठीचा जन्म 6 जुलै 1985 रोजी दिल्ली झाला. तिचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत सरकारी कर्मचारी आहेत, तर तिची आई सेवानिवृत्त शिक्षिका आहे. श्वेता त्रिपाठीचे बालपण अंदमान निकोबार आणि मुंबईत गेले. श्वेताने तिचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून केले आणि त्यानंतर तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले. तिने फॅशन कम्युनिकेशनची पदवी घेतली. श्वेता त्रिपाठीने 29 जून 2018 रोजी रॅपर आणि अभिनेता चैतन्य शर्माशी लग्न केले. गोव्यात हा विवाहसोहळा पार पडला.


श्वेता त्रिपाठीचा विकी कौशलसोबत रोमान्स


श्वेता त्रिपाठीला 24 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या मसान चित्रपटातून खरी ओळख मिळाली. नीरज घायवानच्या मसान चित्रपटातील श्वेता त्रिपाठीची भूमिका खूपच छोटी होती, पण तिचा प्रभाव संपूर्ण चित्रपटात दिसून येतो. छोट्या शहरांतील कथेपासून सुरू होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.


चित्रपट फ्लॉप पण प्रेक्षकांच्या मनाला भिडला


मीडिया रिपोर्टनुसार, मसान चित्रपटाचं बजेट 7 कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 4.63 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. पण हा चित्रपट काळजाला हात घालणारा आहे. तुम्ही मसान चित्रपट यूट्यूबवर फ्री पाहू शकता. विकी कौशलनेही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात विकी-श्वेताची एक छोटीशी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.


श्वेता त्रिपाठीने या चित्रपट आणि सीरीजमध्ये केलंय काम


'मसान' आणि 'मिर्झापूर' या मालिकांमधून श्वेता त्रिपाठीला खूप ओळख मिळाली. याशिवाय त्याने 'हरामखोर', 'ये काली काली आँखे', 'कांजूस', 'लखों में एक', 'मेहंदी सर्कस', 'कलकोट', 'द गॉन गेम', 'रात अकेली है', या चित्रपटात काम केले आहे. 'द इलिगल', 'रश्मी रॉकेट', 'लघुशंका' सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.