Merry Christmas First Review: अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif)  आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती  (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.  'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विजय सेतुपती आणि कतरिना कैफच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आलं आहे. कसा आहे कतरिना आणि विजयचा 'मेरी ख्रिसमस'? जाणून घेऊयात...


विग्नेश शिवननं शेअर केला रिव्ह्यू (Merry Christmas First Review)


फिल्ममेकर विग्नेश शिवननं सोशल मीडियावर 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं," मी विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सने आश्चर्यचकित झालोय, प्रतिभावान श्रीराम राघवनचा हा चित्रपट  आल्फ्रेड हिचकॉकच्या काळात घेऊन जाते.  प्रीतमचे संगीत हा चित्रपटाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, चित्रपटाची शेवटची 30 मिनिटे खूप चांगली आहेत! 12 जानेवारीपासून चित्रपटगृहांमध्ये त्याचा आनंद घ्या!  विजय सेतुपती आम्हाला तुझा अभिमान वाटको! तू भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं साकारली आहेस"




ट्रेड एनालिस्ट सतीश कुमार एम यांनीही 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'मेरी ख्रिसमस हा एक विंटेज थ्रिलर चित्रपट आहे, चित्रपटाच्या सेकंड हाफमधील पोलिस स्टेशनचा सीन मनोरंजक आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये श्रीराम राघवन यांची शैली पाहायला मिळते."






'मेरी ख्रिसमस' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का?


'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. या चित्रपटाचे शूटिंग हिंदी आणि तमिळ भाषेत झाले आहे. श्रीराम राघवन यांचा 2018 मध्ये 'अंधाधुन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्यामध्ये आयुष्मान खुराना आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता 'मेरी ख्रिसमस'  हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या:


Merry Christmas New Song Out : “रात अकेली थी...’; ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमातील नवं गाणं आऊट! कतरिना-विजयच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष