Merry Christmas New Song Out : ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमातील ‘रात अकेली थी’ (Raat Akeli Thi) हे नवं गाणं आऊट झालं आहे. या रोमँटिक गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) हा सिनेमा 2024 च्या बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. श्रीराम राघवन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आधी हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवण्यासाठी ‘मेरी ख्रिसमस’ या सिनेमातील रोमँटिक ट्रॅक रिलीज करण्यात आला आहे. 


‘मेरी ख्रिसमस’मधील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


‘मेरी ख्रिसमस’च्या निर्मात्यांनी ‘रात अकेली थी’चा रोमँटिक ट्रॅक रिलीज केला आहे. या गाण्यात कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्यातील कतरिना आणि विजयची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या गाण्यातील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लक्षवेधी आहे. अरिजीत सिंहने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. ‘रात अकेली थी’ हे गाणं प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. तर वरुण ग्रोवरने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 






‘अंधाधुन’ या सिनेमानंतर श्रीराम राघवन ‘मेरी ख्रिसमस’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पहिल्यांदाच कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीची जोडी झळकणार आहे. कतरिना आणि विजयसह अश्विनी कालसेकर आणि राधिका आपटेदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषांमध्ये या सिनेमाचं शूट करण्यात आलं आहे. 


‘मेरी ख्रिसमस’ कधी रिलीज होणार? (Merry Christmas Release Date)


‘मेरी ख्रिसमस’च्या हिंदी वर्जनमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काजमी आणि टीनू आनंद हे कालाकर झळकतील. तर दुसरीकडे तामिळमध्ये राधिका सरथकुमार, गायत्री आणि शनमुगरन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मेरी ख्रिसमस’ हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Merry Christmas Song Out: 'मेरी ख्रिसमस' मधील 'नजर तेरी तुफान' गाणं रिलीज; कतरिना आणि विजयच्या लिपलॉक सीननं वेधलं लक्ष