Merry Christmas : बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीना कपूर, अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मापासून ते अर्जुन कपूरपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा यात समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री करीना कपूर नाताळात कोरोनामुक्त झाली आहे. त्यामुळे तिच्यासाठी यंदाचा नाताळ नक्कीच खास आहे. करीनाने सैफ अली खान तसेच तैमूर आणि जेह अली खानची
प्रतिमा असलेला फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करून चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी सांताक्लॉज फिल्टर वापरून एक फोटो शेअर केला आहे. अनुष्का शर्माने पती विराट कोहली आणि सांताक्लॉज सोबतचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखील चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने X-mas ट्री आणि सांता टोपी घातलेला फोटो शेअर करत लिहिले आहे, तुम्हा सर्वांना शांततापूर्ण आणि आनंददायी नाताळच्या शुभेच्छा". नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी करिश्मा कपूरने विचित्र कॅप्शनसह स्वतःचा एक विचित्र फोटो शेअर केला आहे.
संबंधित बातम्या