Meghna Gulzar Next Film Shooting : मेघना गुलजार (Meghna Gulzar) दिग्दर्शित 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या सिनेमाच्या आगामी भागाची उत्सुकता आहे.


'सॅम बहादुर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मेघना गुलजार यांनी सांभाळली आहे. त्यांची दिग्दर्शन शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या सिनेमानंतर मेघना बॉलिवूडच्या बड्या स्टारसोबत सिनेमा करणार असल्याचं समोर आलं आहे. हा स्टार दुसरा-तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आहे. 


मेघना गुलजार लवकरच करणार शूटिंगला सुरुवात


पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि मेघना गुलजार गेल्या अनेक दिवसांपासून एका कलाकृतीबद्दल चर्चा करत आहेत. अखेर आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या सिनेमाची कथा देशाचा आश्चर्यचकित करणारी आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा असू शकतो असे म्हटले जात आहे. 2024 च्या मध्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 




मेघना गुलजार सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या कथानकावर काम करत आहेत. अंतिम टप्प्यात हे काम सुरू आहे. या कलाकृतीसाठी मेघना गुलजार अनेक वर्षांपासून रिसर्च करत आहेत. सिद्धार्थ मल्होत्राने सिनेमाची कथा ऐकल्यानंतर लगेचच आपला होकार कळवला होता. मेघना आणि सिद्धार्थ दोघेही या सिनेमासाठी खूप उत्सुक आहेत. जंगली पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 


सिद्धार्थच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Sidharth Malhotra Upcoming Movies)


सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच योद्धा या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तसेच सिद्धार्थकडे दिनेश विजानचाही सिनेमा आहे. आता सिद्धार्थ मल्होत्राच्या पाईपलाईनमध्ये मेघना गुलजारच्या आगामी सिनेमाचाही समावेश आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा 'मिशन मजनू' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता सिद्धार्थच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Sam Bahadur Review : अवश्य पाहावा असा विकी कौशलने मूर्तीमंत उभा केलेला 'सॅम बहादूर'