Marathi Natak : गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार नाटकं (Marathi Natak) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तर प्रेक्षकदेखील आता नाटकांना पसंती देताना दिसत आहेत. या वीकेंडलादेखील नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'चारचौघी', 'अलबत्या गलबत्या', 'खरं खरं सांगा' अशी अनेक नाटकं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत.
अलबत्या गलबत्या : 'अलबत्या गलबत्या' हे व्यावसायिक बालनाट्य बालप्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
24 सप्टेंबर - आचार्य अत्रे नाट्यमंदिर (कल्याण) दुपारी 4.30 वा.
25 सप्टेंबर - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) दुपारी 4 वाजता
25 सप्टेंबर - गडकरी रंगायतन (ठाणे) रात्री 8.30 वाजता
चारचौघी : 'चारचौघी' हे नाटक नुकतचं नव्या संचात रंगभूमीवर आलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत दळवीने या नाटकाचं लेखन केलं आहे.
24 सप्टेंबर - प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) दुपारी 4 वाजता
25 सप्टेंबर - गडकरी रंगायतन (ठाणे) दुपारी 4.30 वाजता
खरं खरं सांगा :
24 सप्टेंबर - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) दुपारी 4 वाजता
हरवलेल्या पत्त्यांचा बंगला : 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' हे नाटक स्वरा मोकाशी यांनी लिहिलं असून चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलं आहे. या नाटकात प्रतीक्षा लोणकर, दीप्ती लेले, राजन जोशी, अथर्व नाकती आणि वंदना गुप्ते महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
24 सप्टेंबर - गडकरी रंगायतन (ठाणे) दुपारी 4.30 वाजता
25 सप्टेंबर - शिवाजी मंदिर (दादर) दुपारी 4 वाजता
हिच तर फॅमिलीची गंमत आहे :
25 सप्टेंबर - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) रात्री 8.30 वाजता
कुर्रर्रर्रर्र :
25 सप्टेंबर - प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) दुपारी 4 वाजता
अ परफेक्ट मर्डर :
25 सप्टेंबर - रवींद्र नाट्यमंदिर (प्रभादेवी) दुपारी 4 वाजता
संबंधित बातम्या