Amitabh Bachchan Son In Law Kunal Kapoor Success Story : बॉलिवूडमध्ये नशीब आजमवायला देशभरातील अनेक तरुण मायानगरी मुंबईत येत असतात. पण त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अनेक कलाकारांनी मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. तर दुसरीकडे अनेक कलाकारांनी फेम मिळाल्यानंतरही सिनेसृष्टीला अलविदा केलं आहे. 


बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्याने अनेक कलाकार निराश होऊन त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडला. पण एका अभिनेत्याने सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आमिर खानसारख्या सुपरस्टारसोबतही त्याने काम केलं. पण तरीही सिनेसृष्टीत त्याला हवं तेवढं यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. आज तो अभिनेता म्हणून नव्हे तर एक यशस्वी उद्योग म्हणून ओळखला जातो. 


अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जावई आहे. खरं तर कुणालने 'रंग दे बसंती'सारख्या हिट सिनेमांत काम केलं आहे. पण आता अभिनयक्षेत्र सोडून त्याने उद्योगक्षेत्राची निवड केली आहे. कुणाल कपूर टॉप क्राउड-फंडिंग प्लॅटफॉर्म Ketto चे सह-संस्थापक आहेत. कुणालने 2012 मध्ये जहीर अडेनवाला आणि वरुण सेठसोबत या कंपनीची स्थापना केली. 


कुणालचा सिनेप्रवास...


कुणालने 'मीनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज' या सिनेमाच्या माध्यमातून 2004 मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. एमएफ हुसैन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात कुणाल तब्बूसोबत झळकला. त्यानंतर त्याने आमिर खानच्या 'रंग दे बसंती' या सिनेमात काम केलं. चुनरी में दाग, आजा नचने, डॉन 2, वेलकम टू सज्जनपुर, हॅट्रिक, डिअर जिंदगी और बचना ए-हसीनोसह अनेक सिनेमांत कुणालने काम केलं आहे. 


कुणालने ओटीटी विश्वातही आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आहे. 2021 मध्ये 'एम्पायर' या वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने ओटीटीवर पदार्पण केलं. कुणालने आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क केलं आहे. कुणाल एक दर्जेदार अभिनेता आहे. अमिताभ बच्चन यांच्या नावापेक्षा कुणाल कपूर या नावाने तो लोकप्रिय आहे. अभिनेता होण्याआधी कुणालने अमिताभ बच्चन आणि मनोज बाजपेयीच्या 'अक्स' या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. कुणाल कपूर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 'कोई जाने ना' या सिनेमात कुणाल शेवटचा दिसला होता.


संबंधित बातम्या


Happy Birthday Kunal Kapoor : सहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेता; 'रंग दे बसंती' फेम कुणाल कपूरविषयी जाणून घ्या...