Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन


Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी'चा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात, 'सपने सुहाने लडकपन केचा रिमेक...'


Sara Kahi Tichyasathi : छोट्या पडद्यावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आता 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दोन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा थाटात पार पडला साखरपुडा


Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्याडे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Viral Video: तमन्ना भाटियाच्या गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; जबरदस्त डान्स पाहून नेटकरी म्हणाले, 'नाद खुळा...'


Aishwarya Narkar And Avinash Narkar: अभिनेत्री  तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)  या अभिनेत्रीच्या  'कावाला' (Kaavaalaa) या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. कावाला गाण्याची हूक स्टेप आणि या गाण्यामधील तमन्नाचा डान्स नेटकऱ्यांना आवडला आहे. त्यामुळेच हे गाणंं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. नुकताच कावाला या गाण्यावरील भन्नाट डान्सचा व्हिडीओ अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar)  आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


पहिला सेलिब्रिटी क्रश कोणता? 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रींनी दिलेल्या उत्तरांनी वेधलं लक्ष


Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva)  या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. एका मुलाखतीमध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटांमधील अभिनेत्रींना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना या अभिनेत्रींनी दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा