Hruta Durgule: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळेचा (Hruta Durgule) चाहता वर्ग मोठा आहे. हृताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत असतात. हृता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. हृता आणि प्रतिक शाह यांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. हृता आणि प्रतिकच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल...
हृता आणि प्रतिकची लव्ह स्टोरी
हृतानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि प्रतिकच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. ती म्हणाली, 'मुग्धा शहामुळे माझी ओळख प्रतिकसोबत झाली. तेव्हा मुग्धाताईनं मला सांगितलं होतं की, माझा मुलगा प्रतिक हा शो सेटअप करतो. त्याच्या ओळखी आहेत. तू त्याच्यासोबत बोल. त्यानंतर आमचं कामानिमित्त बोलणं व्हायचं. त्यानंतर त्यानं मला लग्नाबद्दल विचारलं.'
हृता दुर्गुळे एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'अभिनय क्षेत्रात करिअर करायचा विचार केला नव्हता. माझं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर एवढेच पर्याय होते.' हृता दुर्गुळेनं मुलाखतीमध्ये तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितलं, 'दुर्वा मालिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. त्यामध्ये मी सिलेक्ट झाले. मला बाबांनी तेव्हा सांगितलं होतं की तू मालिकेत काम कर पण शिक्षणपण पूर्ण कर. मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर गेले तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. आम्ही वाईमध्ये शूटिंगला गेले होतो. मला जेव्हा कळालं माझा विनय काकांसोबत सीन आहे, तेव्हा मी खूप नर्व्हस झाले होते.'
हृताच्या सासूबाई देखील आहेत अभिनेत्री
हृताची सासू मुग्धा शहा या देखील अभिनेत्री आहेत. मराठी, हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये मुग्धा शहा यांनी काम केलं आहे. तसेच मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं पंढरपूर या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
टाईपमपास-3, अनन्या या चित्रपटांमधील हृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हृतानं मन उडू उडू झालं, फुलपाखरु आणि दुर्वा या मालिकांमध्ये काम केलं आहे. हृता ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Hruta Durgule : हृता दुर्गुळेचा जबरा फॅन; दिली अनोखी भेट, गिफ्ट पाहून हृता म्हणते...